चांगल्या लोकांसोबत नेहमी वाईट का होते? स्वामींनी दिले हे उत्तर…

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. आपल्या प्रत्येकाच्या मनात नेहमी येते की मी कोणाचे वाईट केले नाही, मी कोणाला कधी काही त्रास दिला नाही तरी माझ्या सोबतच वाईट का होते? मी तर नेहमी देवावर विश्वास ठेवतो, त्याची सेवा करतो, चांगल्या मार्गावर चालतो, चांगली कर्म करतो, तरीही माझ्या सोबत नेहमी वाईट का होते? से विचार नेहमी तुमच्या आमच्या मनात येत असतात. अश्या सर्व प्रश्नांची उत्तरे स्वामी समर्थांनी दिली आहेत.

एकदा अर्जुन कृष्णाला विचारतो! की हे वासू देवा नेहमी खऱ्या आणि चांगल्या माणसासोबत वाईट का होते..? या वर कृष्णा ने एक गोष्ट सांगितली..  या गोष्टी मध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. कृष्ण म्हणतो की ऐका नगरामध्ये दोन पुरुष राहत होते. पहिला व्यापारी होता. तो खूप चांगला माणूस होता. धर्म आणि नितीचे पालन करायचा, चांगले कर्म करायचा,देवाची भक्ती करायचा, आणि मंदिरामध्ये जाऊन देवाची सेवा करायचा. सगळ्या वाईट कामापासून तो दूर राहायचा आणि जो दुसरा पुरुष होता तो वाईट प्रवृत्तीचा होता. तो नेहमी वाईट कामे करायचा, खोट बोलायचा, तो नेहमी अनियती आणि अधार्मिक काम करायचं, तो नेहमी मंदिरातून पैसे आणि चप्पल चोरायचा, वाईट संगतीत होता. आणि खूप व्यसनी होता.

ऐका दिवशी त्या नगरात जोरदार मुसळधार पाऊस सुरू झाला आणि मंदिरामध्ये कोणीच नव्हते.हे पाहून त्या वाईट माणसाने त्या मंदिरातील सर्व पैसे चोरले.. आणि तो पळून गेला. थोड्या वेळाने तो चांगला माणूस व्यापारी दर्शनासाठी मंदिरात गेला. पण लोकांनी त्यांच्यावर्ती चोरीचा आरोप केला. तिथे असलेली सर्व लोक त्याला वाईट बोलू लागली. चोर बोलू लागले. त्याचा खूप अपमान केला.

तो जसेतसे करून मंदिराच्या बाहेर आला. बाहेर येताच एका बेलाने त्याला मारले.पायाखाली चिरडले. तो व्यापारी खूप जखमी झालाआणि तिकडे थोड्या अंतरावर त्या वाईट माणसाला एक पैशाने भरलेली बॅग मिळाली.तो विचार करू लागला. आजचा दिवस किती चांगला आहे. मंदिरातून धन मिळाले आणि आता पैशाने भरलेली बॅग मिळाली.जखमी झालेल्या माणसाने हे सर्व ऐकले व तो घरी आला आणि त्याने घरातील सर्व देवदेवतांचे फोटो काढून टाकले नंतर तो देवावर रुष्ट होऊन जीवन जगू लागला.

खूप वर्ष्यानंतर त्या वाईट माणसाचा आणि त्या चांगल्या माणसाचा मृत्यू झाला आणि ते यमराजाच्या समोर गेले. त्यातील चांगल्या माणसाने यमराजाला प्रश्न विचारला…! मी तर नेहमी चांगले कर्म केले, कोणाचे वाईट केले नाही, तरी मला दुःख अपमान का? आणि या वाईट माणसाने अधर्म केला तरी याला धन मिळाले. हे असे का?  यमराज म्हणाला ज्या दिवशी तुझ्या सोबत दुर्घटना घडली बेलाने तुला मारले.तो तुझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस होता.परंतु तुझ्या चांगल्या कर्मामुळे तुझा मृत्यू झाला नाही आणि या वाईट माणसाला राजयोग मिळणार होता, परंतु याच्या वाईट कर्मामुळे त्याचा राजयोग एका धनाच्या बॅग मध्ये झाला.

स्वामी म्हणतात.. की भगवंत तुमची साथ कोणत्या स्वरूपात देतो हे सांगणे कठीण असते. परंतु तुमचे चांगले कर्म तुम्हाला जीवनात चांगली फळे देतात. जीवनात येणाऱ्या समस्या , दुःख,संकटे किंव्हा काहीही जे तुमच्या सोबत होत असते त्यांनी कधीही हे समजू नका की देव त्यांच्या सोबत नाही. तर मित्रांनो तुम्हाला ही अस वाटत असेल की माझ्यासोबतच वाईट का होते .मी तर चांगले कर्म करतो,तर मित्रांनो वाईट तुमच्यासोबत झाले आहे. त्या पेक्ष्या वाईट तुमच्यासोबत होणार होते. पण तुमच्या चांगल्या कर्मामुळे तुम्हाला ते कमी प्रमाणात आले आहे. असे समजून तुम्ही आयुष्य जगा.. तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *