चरबीच्या गाठी मुळापासून संपवा, गाठी मेणासारख्या वितळून जातील या उपायाने…

मित्रांनो अनेकांच्या शरीरावर निरोपद्रवी स्वरूपाच्या चरबीच्या गाठी असतात. अश्या चरबीच्या गाठी होण्यामागे ठराविक कारण नसते. पण अनुवंशिकता यांच्याशी ह्या गाठीचा जवळचा संपर्क आहे. सांगायचं तात्पर्य एवढेच की आजचा उपाय करण्याबरोबरच योगासने, प्राणायम किंवा घाम निघेल असा कोणताही व्यायाम केल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्याबरोबरच नको असणाऱ्या गाठी ही कमी होतील.

शरीराच्या वेदनाविरहित गाठी कमी करण्यासाठी आजचा हा उपाय आणि आहारातील पुढे सांगितल्याप्रमाणे पथ्य पाळून हा उपाय केला तर गाठींचे ऑपरेशन करण्याची वेळ येणार नाही.
चरबीच्या गाठी कमी करण्यासाठी आजचा ह्या उपायांसाठी आपल्याला फक्त तीन वस्तू लागणार आहेत.

त्यापैकी पहिला घटक म्हणजे ‘नीम तेल’ कडुलिंबाच्या बियांच्यापासून काढले जाणारे हे नीम तेल चरबीच्या गाठी जीरवण्यासाठी उपयुक्त असते. आपण एक चमचा नीम तेल एका वाटीमध्ये घ्यायचे आहे या नंतर चा दुसरा घटक म्हणजे ‘जवस तेल’.

मित्रांनो दररोज च्या जेवणामध्ये जवसाच्या चटणीचा समावेश असेल आणि चरबी वाढवणारा आपला आहार नसेल तर शरीरातील अतिरिक्त चरबी या जवसाच्या तेलाने कमी करता येते. जवसाच्या तेल देखील एक चमचा या प्रमाणे घ्यायचं आहे. या नंतर चा तिसरा घटक म्हणजे ग्रीन टी पावडर.

वजन कमी करण्यासाठी नेहमी व्यायमा सोबतच सकाळ संध्याकाळ ग्रीन टी पिल्याने वजन कमी होण्यास फायदा होतो. आपण ही ग्रीन टी पावडर अर्धा चमचा घ्यायची आहे, आणि हे सगळे मिश्रण एकजीव करून घ्यायच आहे. मित्रांनो ग्रीन टी पावडार, नीम तेल, आणि जवस तेल किरणामालाच्या दुकानात देखील सहज उपलब्ध होते, आणि हे तिन्ही घटक शरीरामधील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी उत्तम रित्या कार्य करतात.

अश्या ह्या चरबीच्या गाठी हळू हळू वाढलेल्या असल्याने त्या कमी करण्यासाठी देखील भरपूर वेळ द्यावा लागतो. आता ही तयार झालेली पेस्ट चरबीच्या गाठीवर कशी लावायची..? चरबीची गाठ असलेल्या जागी ही पेस्ट बोटाच्या साह्याने लावून त्या गाठींची हलक्या हाताने मालिश करायची आहे.

एक ते दोन मिनिटानंतर कापसाचा बोळा घेऊन त्यावर ठेवून ब्यांडेज पट्टीने कापूस त्यावर चिटकवून ठेवायचा आहे. जेणेकरून त्यावरचे तेल इतरत्र कपड्याला लागू नये. कमीत कमी सात दिवस हा उपाय करणे उपेक्षित आहे.

तुमच्या गाठींची साइज मोठी असेल तर तीन ते चार दिवस ग्याप ठेवून पुन्हा सात दिवस हा उपाय करावा दररोज न चुकता प्राणायम, योगासने केल्याने आणि आहारातून तेलकट पदार्थ आणि मैद्याचे पदार्थ अति मसालेदार पदार्थ, भात, उडीद डाळ हे टाळ्याने तुम्हाला लवकरात लवकर रिझल्ट मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *