घरात इथे ठेवा तुरटी पैसा इतका येईल की सांभाळता येणार नाही होईल धनप्राप्ति…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो घरात या ठिकाणी ठेवा तुरटीचा खडा पैसे इतके येतील की तुम्ही विचार सुधा करू शकणार नाही. तुमचा विश्वास असो किंव्हा नसो मात्र तुरटीचा प्रयोग, तुरटीचे चमत्कार हे जगविख्यात आहेत. अगदी प्राचीन काळापासून धन प्राप्ती साठी म्हणजेच पैसे मिळवण्यासाठी तुरटीचा वापर करण्यात येतो. मित्रांनो आपल्या घरामध्ये आपण या विशिष्ट ठिकाणी तुरटी ठेवली तर आपल्या जीवनामध्ये पैसे आल्या शिवाय राहणार नाही.

मित्रांनो अगदी प्राचीन काळापासून अगदी मोठं मोठ्या राजा महाराजांनी सुद्धा हे तुरटीचे प्रयोग केलेले आहेत आणि प्रचंड पैसे कमावलेले आहेत. आजच्या कलियुगात सुद्धा अनेक जण तुरटीचा वापर करून पैसे कमावत आहेत. मित्रांनो आयुर्वेदामध्ये तुरटी ही अँटीसेप्टिक म्हणून वापरली जाते. जर त्वच्या कुठे फाटली असेल कापले असेल तर त्या ठिकाणी तुरटी लावली जाते. या आयुर्वेदिक वापरा बरोबरच जोतिषशास्त्रमध्ये, वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा या तुरटीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आणि हे खूप कमी लोकांना माहीत आहे.

मित्रांनो जो उपाय आज आपण पाहणार आहोत त्या पूर्वी छोटे छोटे नियम आपल्याला माहिती पाहिजेत. तुम्हाला माहीती असेल की कोणतेही काम करण्यापूर्वी त्या कामाबद्धल आपल्या मनात पूर्ण विश्वास पूर्ण श्रद्धा असली पाहिजे. हा तुरटीचा प्रयोग करताना सुद्धा आपल्या मनामध्ये या उपायाविषयी पूर्ण श्रद्धा असावी, पूर्ण विश्वास असावा की मी हा जो उपाय करतोय हा उपाय केल्यानंतर माझ्या घरामध्ये पैसे हे येणारच आहेत.

माझ्या कामामध्ये आतापर्यंत जे काही अडथळे येत होते ते अडथळे दूर होऊन मी जे काम करतोय ते काम पूर्ण होणार आहे आणि या कामामधून मला पैसे सुद्धा मिळणार आहेत. मित्रांनो पैसे कमवण्यासाठी माता लक्ष्मी ची कृपा आपल्यावरती असावी लागते. हा खडा नक्की कुठे ठेवायचा आहे तर तुमचा घरामध्ये जितक्या रूम आहेत जितक्या खोल्या आहेत त्या प्रत्येक खोलीमध्ये एका छोट्याश्या वाटीत आपण हा तुरटीचा तुकडा ठेवायचा आहे.

त्याचबरोबर तुमचे जे दुकान असेल तुम्ही ज्या ठिकाणी नोकरी करताय थोडक्यात तुम्ही ज्याज्या ठिकाणी वावरताय त्या सर्व ठिकाणी आपण हा तुरटीचा एक एक खडा ठेवायचा आहे. या सोबतच आपली जी चौकट आहे आपले जे मुख्य प्रवेशद्वार आहे की ज्या ठिकाणाहून आपण आत येतो त्या चौकटीला सुद्धा आपण एक काळ्या रंगाचे कापड घेऊन त्या कपड्यात एक तुरटीचा तुकडा बांधायचा आहे आणि तो त्या चौकटी ला लटकावून ठेवायचा आहे.

मित्रांनो या मुळे नक्की काय होत की आपल्या घरातील जी नकारात्मक शक्ती आहे की जी आपल्या घरामध्ये पैसे येऊन देत नाही जी आपल्या घरात माता लक्ष्मी ला स्थीर होऊन देत नाही ती नकारात्मक शक्ती दूर जाईल, नष्ट होईल आणि सकारात्मक ऊर्जा घरात येईल. एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो माता लक्ष्मी त्याच ठिकाणी राहते ज्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा असते.

असा हा उपाय केल्यानंतर तुम्हाला दिसून येईल की प्रगतीच्या नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत, प्रगतीचे नवनवीन योग जुळून येत आहेत, कामातील अडथळे दूर होत आहेत.ज्या ठिकणी तुम्ही तुरटी ठेवली आहे ते ठिकाण स्वच्छ राहील याची काळजी घ्या आणि हो माता लक्ष्मीस प्रसन्न करण्यासाठी दररोज माता लक्ष्मी ची पूजा करत चला. आपल्या वर माता लक्ष्मीचा कृपा अखंड बरसो याच मनोकामने सह धन्यवाद…

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *