घरातील ह्या 3 वस्तू शरीरातील 72 हजार नसा मोकळ्या करतात आहारात करा वापर, नसा पूर्णपणे मोकळ्या होतील…

नमस्कार तुमच्या शरीरामधील एखादी नस बंद पडली असेल किंवा तुमच्या नसा बंद होऊ लागल्या असतील किंवा घरामध्ये हा त्रास कोणाला असेल पण तुम्हाला होऊ नये असं वाटत असेल तर आहारामध्ये हे तीन पदार्थ तुम्ही घेणे आवश्यक आहे. हे तीन पदार्थ तुमच्या रक्तवाहिन्यांचे, कॅपिलरितील आतील पेशींचं आरोग्य सुधारतात. त्या मजबूत करतात. आणि बंद झालेल्या नसा मोकळ्या होतात. रक्‍तवाहिन्या मोकळ्या झाल्यामुळे वेरीकोज वेन्सचा जो त्रास आहे तो निघून जातो, हे तीन पदार्थ कसे खायचे आहेत, त्याचा वापर कसा करायचा आहे आणि हे तीन पदार्थ तुमच्या बंद झालेल्या नसा कशा मोकळ्या करतात हे सांगणार आहे.

वेरीकोज वेन्स आणि नसा बंद होणे यामध्ये काय फरक आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्या शरीरामध्ये दोन प्रकारच्या रक्तवाहिन्या असतात. आणि एक रक्त वाहून नेणारी व दुसरी रक्त परत हृदयाकडे घेऊन येणारी. धमन्यामार्फत रक्त हे शरीराकडे पाठवले जाते. हे कार्य पंपा मार्फत होतं. हृदय हे पंपा सारखं काम करतो. पूर्ण शरीरभर, सर्व पेशींपर्यंत धमण्यामार्फत पोहचवल जात. धमण्याना एकदम छोट्या छोट्या कॅपिलरी असतात. छोट्या छोट्या नळ्या असतात त्यांना आपण कॅपलरी असे म्हणतो.

जर तुमच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढले असेल तर या कॅपिलरीमध्ये ब्लोकेज येतात. त्याला आपण नसा चोकप झाल्या असे म्हणतो. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे शिरा. त्या काय करतात आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी तील इम्पयूर ब्लड हृदयाकडे वाहून नेतात. परंतु हे वाहून आणत असताना कोणताही पंप मदत करत नसतो तर हे कार्य झडपांच्या मार्फत होत असते. पण या झडपा जर कमजोर असतील, तर मग हे रक्त त्या ठिकाणी साठवून राहत आणि शिरा फुगलेल्या दिसतात.

काही वेळा निळसर दिसतात ज्याला आपण वेरीकोज वेन्स असे म्हणतो. हा वेरीकोज वेन्सचा त्रास असेल किंवा बंद नसा असतील तर, या दोन्ही साठी आयुर्वेदिक उपाय सांगणार आहे. हे तीन पदार्थ जर तुम्ही आहारामध्ये वापरले तर वेरीकोज वेन्सचा त्रास पुढे होणार नाही आणि बंद झालेल्या नसा मोकळ्या होण्यासाठी मदत होईल. या तिन्ही पदार्थाचा वापर वेगवेगळ्या वेळी करायचा आहे.

यासाठी एक वेळेसाठी दोन अंजीर व दहा ते बारा मनुके घ्यायचे आहेत. आणि ते एक ग्लास पाण्यामध्ये रात्री भिजत घालायचे आहे. सकाळी आधी मनुके आणि अंजीर खाऊन घ्यायचे आहे. त्या नंतर ते पाणी आपल्याला प्यायचे आहे. या नंतर धमनी आणि शिरांच्या मधले इंटर्नल पेशी आहेत त्या मजबूत आहेत. कारण यामध्ये लोह भरपूर प्रमाणात असतं आणि दुसरे मायक्रोन्यूट्रिएंट असतात ते चांगल्या रीतीने कार्य करतात.

शिवाय यामध्ये फायबर असते त्यामुळे पोट नीट साफ होते. यामुळे पचनशक्ती सुधारते व किडनी स्वच्छ राहते याचा अर्थ असा की शरीरातील जे विषारी घटक आहेत ते बाहेर निघून जातात. आपल्या शरीरामधून अशुद्धी निघून गेल्यामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढत नाही. रक्तातील पाण्याची पातळी नियंत्रित राहते. हे रोज सकाळी आपल्याला उपाशीपोटी घ्यायचं आहे. संध्याकाळी भिजत टाकायचे आहे आणि सकाळी उपाशी पोटी खायची आहेत. यामुळे मूळव्याधीचा त्रास ही कमी होतो. वजन नियंत्रणामध्ये राहील.

तिसरा जो पदार्थ वापरायचा आहे तो म्हणजे जवस. जवस थोडस भाजून घ्यायचा आहे आणि स्टोअर करून ठेवायचे आहे. एका डब्यामध्ये भाजून ठेवू शकता. हे प्रत्येक वेळी जेवण झालं की एक चमचा खायचा आहे. या पदार्थांमध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असते. हे असे तुमच्या शरीरामधील साठलेलं कोलेस्ट्रॉल नष्ट करत. साठलेला कोलेस्ट्रॉल ला विरघळून टाकतो. यामुळे तुमच्या शरीरामध्ये नवीन कोलेस्टेरॉल तयार होत नाही. तुमच्या आहारामध्ये वू या तीन घटकांचा भाग असू द्या.यामुळे आरोग्य चांगले राहते व फॅट कोलेस्ट्रॉल साठत नाही. हा उपाय लहान मोठे सगळे वापरू शकतात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *