घरातील पाली पळवण्याचे सर्वात सोपे व सुरक्षित उपाय…

मित्रांनो खालील दिलेली माहिती आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाची आहे त्यामुळे संपूर्ण लेख नक्की वाचा, आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कँमेंट मध्ये आम्हाला नक्की विचारा…

पाल हा प्रत्येक घरात सापडणार प्राणी आहे. पाल जरी आपणाला नुसती दिसली तरी आपण प्रत्येक जण घाबरत असतो. आणि लहान मुले तर धुम ठोकतात. पाल घालवण्यासाठी बाजारामध्ये खूप कीटकनाशके आहेत, पण ती आपण वापरात नाही कारण ती विषारी असतात आणि घरामध्ये कीटकनाशके वापरणे धोकादायक असते. आज आपण पालीला पळवून लावण्यासाठी खूप साधे आणि सोपे उपाय आपण पाहणार आहोत .

उपाय पहिला : कॉफी पावडर व तंबाखु : कॉफी पावडर व तंबाखु हे एकत्र करून ते चांगले मिक्स करायचे आहे व त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या कराव्यात आणि पाल जेथे येते तिथे त्या गोळ्या ठेवाव्यात. हे मिश्रण पालीने खाले तर पाल मारून जाईल किंवा ती पळून जाईल.

उपाय दुसरा *डांबरगोळ्या : डांबरगोळ्या उत्तम कीटकनाशके असतात त्यांना वॉशबेसीन मध्ये ठेवाव्यात पाल येणार नाही. उपाय तिसरा * मोरपंख : पालीना मोरपंख पाहून साप असल्याचा भास होतो. मोरपंख जर पाली येण्याच्या ठिकाणी टांगून ठेवले तर पाली घाबरून पळून जातात .

उपाय चौथा *पेपर पेस्टीसाईड : पाणी आणि काळी मिरची मिक्स करा त्याचे पेस्टीसाईड तयार करा व ते किचन मध्ये शिंपडा या वासाने पाल पळून जाते

उपाय पाचवा * बर्फाचे थंड पाणी : बर्फाचे थंड पाणी पालीवर फेका, असे काही दिवस करा थंडावा सहन न झाल्याने पाल घर सोडून निघून जाईल .

उपाय सहावा * कांदा : कांदा कापून त्याचे लहान लहान काप लाईट च्या ठिकाणी बांधा, कांद्याचा वास पाली ला सहन होत नाही व पाल पळून जाते .

उपाय सातवा *अंड्याचे कवच : अंड्याच्या कवचाला कोणताही दुर्गंध नसतो पण अंड्याचे कवच पाहून पालीला वाटते की हा कोणतातरी प्राणी आहे व तो तिला खाऊन टाकेल या भितीने पाल तेथून पळून जाते .

उपाय आठवा *लसूण : एक स्प्रे बॉटल घ्या, त्यात कांद्याचा रस आणि पाणी मिसळून घ्या आणि त्या नंतर त्या मध्ये लसणाचा रस टाका आणि मग जेथे जेथे पाल असेल त्या ठिकाणी हा स्प्रे करा ह्या वासाने पाल येणार नाही

हे होते घरातील पाली पळवून लावण्याचे साधे व सोपे उपाय, मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *