Sunday, November 27
Shadow

गुळाचा चहा बनवण्याची योग्य पद्धत, असा करा गुळाचा चहा कधीच फुटणार नाही…

तुम्हाला जर खाण्याची आवड असेल किंवा नवीन नवीन पदार्थ बनविण्याची आवड असेल, तर तुमचे स्वागत आहे आमच्या “चविष्ट जेवण” या चॅनलमध्ये. तर आज आपण गुळाचा चहा बनविला आहे. अतिशय स्वादिष्ट. चहा तसा सर्वांनाच आवडतो साधारण देशातील ९० टक्के लोकांना चहा आवडतो. तुमच्यासाठी आज मी नवीन रेसीपी घेऊन आले आहे गुळाचा चहा. आपण नेहमीच साखरेचा चहा पितो पण हा चहा नक्की करून बघा खूपच छान लागतो. चला मग आज या नवीन रेसीपीला सुरुवात करूया.

सगळ्यात आधी मी गॅसवर एक भांडे ठेवले आहेव त्यात एक कप पाणी घेते आहे. त्यात मी एक चमचा चहा पाऊडर टाकते आहे. कोणतीही चहा पाऊडर चालेलजी तुम्ही रोज वापरत असाल ती चहा पाऊडर घ्यायची आहे. आता हे आपल्याला उकळून घ्यायचे आहे. त्यामध्ये आपण आले छोट्या किसणीने किसून टाकणार आहोत. ठेचून पण टाकू शकता. गॅस मोठा ठेवला आहे त्यामध्ये आता आपण २ वेलची सालीसकट सोलून टाकायच्या आहेत. गॅस आता थोडा लहान करूया. थोडे ढवळून घ्या. चांगले उकळले की त्यात १ कप दूध तापविलेले त्यात टाकायचे आहे. गूळ आता टाकायचा नाही.

आता याला चांगली उकळी येऊ द्या. मधून मधून चमच्याने हलवत राहा म्हणजे ते सगळे एकजीव होईल. अशी उकळी आली की चव चांगली येईल. आता गॅस मंद करून बारीक किसलेला गूळ त्यात २ चमचे टाकणे. आता परत चमच्याने ढवळत राहा. गुळाचे खडे टाकायचे नाहीत दूध फाटू शकते. त्यामुळे गुळाचा कीस टाकायचा आहे. गूळ विरघळेपर्यंत ढवळत राहा. २ मिनिटे उकळी याला लागतात.

अशा प्रकारे आपला चहा उकळला आहे व चहाला सुगंध छान येतो आहे कारण आपण वेलची व आले चहात घातले आहे. आता आपला चहा तयार झाला आहे. आमची ही रेसीपी तुम्हाला आवडली तर लाइक व शेअर करायला विसरू नका. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशा अनोख्या रेसीपी तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.