गुळाचा चहा पिण्याचे आश्चर्यकारक फायदे, कोणतेच रोग होत नाहीत..

चहा बरेचजणांना आवडतो, कोणी साखर घालतात तर कोणी बिनासाखरेचा. पण तुम्हाला हे माहिती आहे का कि साखरेऐवजी गुळ घातल्याने चहाचा स्वाद चांगला तर येतोच पण त्याला खमंगपणा सुद्धा येतो. गुळाचा वापर पदार्थात करणे हे फायद्याचे आहे फक्त तो कसा आणि किती वापरायचा हे समजून घेणे आवश्यक आहे. मधुमेहाच्या रुग्णांनी गुळ खाल्ला पाहिजे का ? त्याने त्यांचे काही नुकसान होईल का फायदा ? हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. मग चला पाहूया याबाबत आणखी काही.

गुळाच्या चहाचे फायदे खूप असतात. थंडीत हा चहा फार चांगला असतो. याने थंडीपासून रक्षण होते तसेच याने सर्दी खोकला कमी होतो. गुळाने शरीरातील रक्त वाढते आणि नवीन उर्जा मिळते. याने तुमचे पचन सुधारते. कच्चा गुळ खाण्यापेक्षा चहातून घेतलेला कधीही चांगला.

जर तुम्हाला थकवा मिन्वा अशक्तपणा जाणवत असेल तर हा चहा तुम्हाला नक्की फ्रेश करेल. प्राचीन काळापासून गुळाला आरोग्याच्या दृष्टीने अमृत मानले जाते.दिवसातून कमीत कमी २० ग्राम इतका गुळ घेतल्याने तुम्हाला नक्की फरक जाणवेल. साखरेपेक्षा गुळाचे पचन लवकर होते म्हणून पदार्थात गुळ घालणे जास्त योग्य समजले जाते.

तुमचे केस आणि त्वचा यांच्यासाठी सुध्धा गुळाचे सेवन उत्तम मानले गेले आहे. स्त्रियांसाठी गुळ जास्त चांगला आहे कार्य त्यात आयर्नचे प्रमाण जास्त आहे आणि याची स्त्रीच्या शरीराला जास्त गरज असते. याने तुमचे रक्त शुद्ध होते. त्वचेवरील काळे डाग किंवा सुरकुत्या यांच्यासाठी गुळाचे सेवन हा सर्वोत्तम उपाय आहे.

यात अनेक औषधी तत्व आहेत जी तुमची हाडे आणि दात मजबूत करतात म्हणून उतारवयात याचे सेवन चांगले मानले जाते. गुळाच्या चहात जर आले घातले तर अजून चांगला स्वाद येईल. या चहाचे नियमित सेवन खूप फायद्याचे असेल. याने तुमचे पचन लवकर होईल आणि म्हणून पोटाशी संबंधित विकारांपासून तुम्ही स्वतःला दूर ठेवू शकाल.

जेवल्यानंतर गुळ खाणे सगळ्यात चांगले असते.. जर तुम्हाला पचन समस्या असेल तर गुळाबरोबर सैधव मीठ मिसळून चाटले तर तुमचे जेवण पचून तुमची समस्या दूर होईल. मधुमेहाच्या रुग्णांनी याचे सेवन कमी प्रमाणात करायला काहीच हरकत नाही. जर तुम्हाला मुत्राशी संबंधित कोणतेही आजार असतील तर गुळाचे सेवन तुम्ही जरूर केले पाहिजे. जार तुम्ही गुळाचे सेवन दुधाबरोबर केलेत तर फरक तुम्हाला लगेच जाणवून येईल.

तर हे आहेत गुळाचे फायदे. जर तुम्हाला आवडत असेल तर साखरेऐवजी गुळाचे सेवन आजच सुरु करा आणि आम्हाला सांगा.  मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *