गुळवेल काढ्याचे चमत्कारिक फायदे वाचून पायाखालची जमीनच सरकेल…

मित्रांनो आज एक महत्वाची वनस्पती पाहणार आहोत. या वनस्पतीचे नाव आहे अमृता. अमृता म्हणजेच गुळवेल. गुळवेल हे नाव सध्या फेमस होतेय. ज्या गुळवेलाबद्दल माणसांना शुन्य टक्के माहिती होती त्या बऱ्याच लोकांना आज गुळवेलाबद्दल माहिती झाली आहे. एवढंच काय तर ही वनस्पती रस्त्याच्या कडेला छोट्या छोट्या झाडावर आढळते.

त्या ठिकाणी लोक आज गोळा करताना दिसत आहेत. का? तर त्याचे महत्त्वच तेवढे आहे. जे लोक गाव सोडून मुंबईला गेले, ते कधी फोन करत नव्हते ते आज गुळवेलाबद्दल चौकशी करतायेत. गुळवेल हा वेल आपल्याकडे भेटतो आहे का. कारण त्याचं महत्त्वच एवढं वाढलय. पण मित्रांनो बऱ्याच वेळेस काय होते आपण गुळवेलाचा जो काही काढा आहे तो घेण्यासाठी सांगितला जातो.

पण तो व्यवस्थित पैकी आणि पद्धतशीर पैकी काढा घ्यायचा. ज्या लोकांना पोहे खाल्ल्यामुळे पित्ताचा त्रास होतो त्या लोकांनी जर गुळवेलाचा काढा घेतला तर जो काही पित्ताचा त्रास आहे, तो पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी नक्कीच मदत करते. बऱ्याच लोकांना ही वनस्पती ही माहिती नाही. पण आता लोकं ही माहिती करून घ्यायला लागले आहेत. ज्यांना कफ आहे त्यांनी ती मधाबरोबर घ्यावी.

गुळवेलाची वनस्पती ओळखायची कशी? तर त्याची पाने ही हृदयाच्या आकाराची असतात. औषधामधील हे एक अमृत आहे. बऱ्याच लोकांना वाताचे आजार असतात, वाताचे आजार जर दूर करायचे असतील तर गुळवेल व सुंठ याचा काढा घेतला जातो. तो खुप फायदेशीर असतो. उष्णता कमी करण्यासाठी सुद्धा याचा फायदा होतो.

आजच्या अनेक आयुर्वेदिक गोळ्यांमध्ये गुळवेलाचा वापर केला जातो. कारण त्याच महत्त्वचा एवढं आहे. गुळवेल हा करंज, आंबा, लिंब यावरची गुळवेल घ्यावी. जास्तीत जास्त गुळवेल ही लिंबावरची घेतली तर एक चांगल्या प्रकारचे सत्व असते. गुळवेलाच्या सालीवर उचवटे असतात. साल ही करड्या रंगाची असते, मधली साल ही हिरवट व गुळगुळीत असते. चक्रीका हे नाव गुळवेलाला आहे.

जर दरवेळेला ताजी गुळवेल वापरली तर त्याचा फायदा खुप चांगला भेटत असतो. खासकरून ताप कमी करण्यासाठी गुळवेलाचा काढा वापरला जातो. गुळवेलाची पेस्ट करून त्वचेवर लावली तर त्याचपण खुप फायदा भेटू शकतो. सांधेदुखीवर याचा लेप लावला तर याचा खुप फायदा होतो. शरीराच्या चयापचाय क्रियेमध्ये ही गुळवेल खुप लाभदायी आहे.

गुळवेलाच्या पानाची भाजी मेथीच्या भाजीप्रमाणे करून खावी. कारण जेवढे मेथीचे फायदे आहेत त्याच्या पेक्षा कित्येक पटीने फायदे आहेत. साथीच्या आजारांमध्ये गुळवेलाचा फायदा खुप होतो. मधुमेहामध्ये सुद्धा गुळवेलाचा वापर केला जातो. पण मधुमेहाच्या रुग्णांनी याचा वापर वैद्याच्या सल्ल्यानेच करावा. गुळवेल ताजी वापरावी कारण ताजी गुळवेल वापरल्यामुळे खुप फायदा मिळत असतो.

पित्त कमी करायचे असेल तर गुळवेल आणि खडीसाखर ही जर सोबत घेतली तर पित्त कमी होण्यासाठी मदत होऊ शकते. कफ कमी करायचा असेल तर ती मधाबरोबर घेतली तर त्याचा पण फायदा आपल्याला कफ कमी करण्यासाठी होतो. पोटाचे जे काही आजार आहेत तेसुद्धा कमी करण्यासाठी गुळवेलाचा वापर हा चांगल्या पैकी केला जातो. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ही गुळवेल खुप फायदेशीर आहे.

स्वाईन फ्लू असेल, मलेरिया असेल असे आजार आपल्याला होऊ द्यायचे नसतील, आपली जर रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर गुळवेलासारखी दुसरी वनस्पती नाही. आमवात असेल, अंगात ताप असेल, अंग दुखणे असेल यासाठी जर गुळवेलाचा काढा घेतला तर बऱ्याच गोष्टी फायदेशीर होऊ शकतात.

पचनशक्ती सुधारण्यासाठी या गुळवेलाचा आपण वापर करू शकतो. लघवी साफ होत नसेल तर गुळवेलाचा काढा घेतला तर बऱ्याच अंशी तुम्हाला फरक पडू शकतो. ही जी वेल आहे ती प्रत्येकाने आपल्या घरी कुंडीमध्ये लावली तर आपण ताज्या गुळवेलाचा वापर नक्कीच करू शकतो. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *