गरीबी व दारिद्र्य येण्याची ही लक्षणे असतात, आताच तपासून बघा तुमच्या घरी ही कामे होतात का?

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे.

जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही नवीन शिकायचे असेल, तर आमच्या पेजला सबस्क्राईब जरूर करा. मित्रांनो, आपल्या घरात घडणार्‍या कितीतरी गोष्टीत काही संकेत लपलेले असतात. जर हे संकेत समजून घेतले तर आपण जाणून घेऊ शकतो की भविष्यात येणारा तुमचा कालावधी कसा असेल? व तुम्ही समस्यांपासून वाचू शकता.

ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा दारिद्र्य वाढण्याची संभावना असेल, तर घरात छोटे छोटे संकेत तुम्हाला ते दर्शवितात. आजच्या या माहितीमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की गरीबी वाढणारे कोणकोणते संकेत तुम्हाला मिळू शकतात. जर घरात काही संकट येणार असेल, तर त्याचा परिणाम सगळ्यात प्रथम घरात लावलेल्या तुळशीच्या झाडावर होतो.

तुळशीचे झाड एकदम सुकून जाते, ज्यामुळे घरात दारिद्र्य व संकट येणार आहे हे समजते. जर तुमच्या घरातील झाडे किंवा रोपे यांची पाने सुकू लागली तर ती लगेच कापून टाका. घरात लावलेली झाडे हे नेहमी हिरवीगार असली पाहिजेत. घरातील झाडांची पाने सुकायला नकोत. नाहीतर बुध ग्रह खराब होतो. त्यामुळे तुमच्यावर कर्ज वाढू लागते. म्हणून झाडांना रोज पाणी घाला. सुकू देऊ नका.

घरातील गोड पदार्थांना काळ्या मुंग्या येणे हे तुमचा वाईट काळ सुरू होणार आहे हे दर्शविते. घरातील झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे. कारण झाडू दारिद्र्य घरातून बाहेर काढते. त्यामुळे घरात सुख, समृद्धि व धनदौलत येते. झाडूवर कधीही पाय ठेवू नये. त्यामुळे लक्ष्मीचा अपमान होतो. घरातील कोणी लहान मूल अचानक घरात केर काढू लागले, तर घरात कोणीतरी अनाहूत पाहुण्याचे आगमन होणार आहे असे समजावे.

सूर्यास्त झाल्यानंतर घरात झाडू काढू नये केर काढू नये, कारण तो व्यक्तीच्या दुर्भाग्याला आमंत्रण देतो. नाश्ता करण्याच्या आधी केर जरूर काढावा. हे शुभ आहे. झाडूला कधीही उलटे ठेवणे हा अपशकुन मानला जातो. झाडू नेहमी खाली जमिनीवर ठेवावा. झाडू उभा करून ठेवल्याने घरात कलह भांडणे वाढतात. घरात दारिद्र्य येते. अंधार पडल्यावर केर काढू नये. त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते.

घरातील कोणी सदस्य बाहेर गेला तर लगेच केर काढू नये. काही कालावधीनंतर केर काढावा. ते पण देवाला नमस्कार केल्यानंतर. झाडू नेहमी लोकांच्या नजरेपासून लपवून ठेवावा. जसे धन लपवून ठेवले जाते, त्याचप्रमाणे झाडू पण लपवून ठेवावा. वास्तुशास्त्रानुसार घरात झाडूचे एक स्थान निश्चित असावे. नाहीतर आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो.

गाय किंवा कोणत्याही प्राण्याला झाडूने मारू नये. ज्या घरात दूध उकळून सांडते, त्या घरातील लोक आजारी पडतात. वेळ कधीच एकसारखा नसतो. वाईट काळ निघून जाईल जरूर आहे धिराने काम करण्याची. नवीन घरात जर पाल मेलेली दिसली तर पूजा करून घ्या. चुकून पाल अंगावर पडली, म्हणजे डोक्यावर पडली तर तुमच्यासाठी खुशीचा संकेत आहे पण केसांवर पडली तर तुमच्या जीवनात भारी संकट येणार आहे.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच पोस्ट रोज मिळवण्यासाठी आमचे मराठी अस्मिता हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका. वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *