खोकल्याचे सर्वात प्रभावी औषध, कितीही भयंकर कफ मिनिटात बाहेर फेका, डॉ स्वागत तोडकर…

आज आपण असा एक उपाय पाहणार आहोत ज्यामुळे तुम्हाला कोरडा खोकला येत असेल किंवा कफयुक्त खोकला येत असेल तर तो पूर्णपणे बरा होणार आहे. तसेच श्वसनाच्या सर्व समस्यांवर हे रामबाण औषध आहे. या औषधामुळे तुमची ऑक्सिजनची लेव्हल नेहमी शंभर टक्के राहील आणि तुम्हाला कधीही ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही.

याशिवाय घसा खवखवणे, घसा दुखणे, छातीत कफ साचने या सर्व समस्यावर हा उपाय म्हणजे रामबाण औषध आहे. हा उपाय करण्यासाठी पहिला घटक घेणार आहोत हळद. हळदीमध्ये करकुमिंग हा औषधी गुणधर्म असतो. पण त्याचबरोबर ही हळद अँटीइनफ्लेमेंटरी, अँटीअलर्जीक, अँटीऑक्सिडंट या गुणांनी परिपूर्ण असते.

हळद ही आयुर्वेदामधील अँटीबायोटिक म्हणून ओळखली जाते. त्यामुळे जर घशामध्ये जंतुसंसर्ग झाला तर त्या जंतूंना नष्ट करण्याचे काम हळद करते. तर अशी ही हळद पाव चमचा घ्यायची आहे. यानंतर पुढचा घटक घेणार आहोत सुंठीचे चूर्ण. सुंठीमध्ये अँटीऑक्सिडंट, अँटीइनफ्लेमेंटरी हे गुणधर्म असतात. त्यामुळे घशाला आलेली सूज सुंठीमुळे कमी होते.

तर अशी ही सुंठ अर्धा चमचा या हळदीमध्ये मिक्स कारायची आहे. यानंतर तिसरा घटक घेणार आहोत काळ्या मिरीचे चूर्ण. काळ्या मिरीमध्ये अँटीबॅक्टरीयल गुणधर्म असतात. त्यामुळे घशातील जंतूंचा नायनाट होतो. त्याचबरोबर काळी मिरी ही कफनाशक असते. तर ही काळी मिरी मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे.

जेणेकरून काळ्या मिरीची एकदम बारीक पावडर तयार होईल. तर अशा काळ्या मिरीचे चूर्ण एक चिमूटभर टाकायचे आहे. यानंतर शेवटचा घटक घेणार आहोत मध. मधाला आयुर्वेदामध्ये संपूर्ण आहाराचा दर्जा देण्यात आला आहे. मधामध्ये अँटीबायोटिक गुणधर्म असतात. मधामुळे घशातील जंतुसंसर्ग कमी होतो.

तसेच घशातील खवखव, घसा दुखणे आणि खोकला यांपासून आराम मिळतो. तर असा गुणकारी मध एक चमचा घ्यायचा आहे. यानंतर हे चारही घटक एकजीव करून घ्यायचे आहेत. एकजीव झाल्यानंतर आपले हे औषध तयार होईल. या औषधामुळे तुमच्या शरीरातील ऑक्सिजनची लेव्हल नेहमी शंभर टक्के राहील. तर हे औषध एका व्यक्तीसाठी एक वेळचे तयार झाले आहे.

हे तयार झालेले औषध एकाच वेळी थोडे थोडे करून चाटून खायचे आहे. जेणेकरून या औषधाचा घशामध्ये हलकासा थर तयार होईल व घशामधील इन्फेक्शन दूर होईल. हे औषध घेतल्यानंतर अर्धा तास काहीही खाऊ नये किंवा पाणी सुद्धा पिऊ नये. औषध घेतल्यानंतर अर्धा तासाने तुम्हाला हवे असेल तर तुम्ही पिऊ शकता. तर असा उपाय तुम्हाला दिवसातून तीन वेळा करायचा आहे.

फक्त पहिल्या वापरानंतर तुमच्या घशातील खवखव पूर्णपणे बंद होईल. याचप्रमाणे तुमचा खोकलाही पुर्णपणे बंद होईल. याशिवाय छातीतील कफ सुद्धा या उपायाने नष्ट होईल आणि तुमची ऑक्सिजनची लेव्हल नेहमी शंभर टक्के राहील. या उपायाने तुमच्या घशासंदर्भात सर्व समस्या दूर होतील. धन्यवाद…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *