खात्रीने सांगतो शुगरच्या गोळ्याच फेकून द्याल, अशी 3 पाने, 3 दिवस वापरून शुगर चेक करा…

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. मित्रांनो भारतात जवळजवळ सात कोटीच्या आसपास लोक हे मधुमेहाने ग्रासलेले आहेत. याचे कारणही तसेच आहे ते म्हणजे बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि अयोग्य आहार आणि याच कारणांमुळे दिवसेंदिवस डायबेटिसच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे.

वास्तविक स्वादुपिंड म्हणजेच पॅनक्रियाज मधून स्त्रावणारी इन्सुलिन हे या रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवते. मात्र मधुमेहाच्या अवस्थेत इन्सुलिनची उत्पत्ती कमी झाल्याने या साखरेवर नियंत्रण ठेवले जात नाही. पण आजचा हा घरगुती उपाय तुम्ही फक्त एक आठवडाभर न चुकता केला तरी तुमची इन्सुलिन लेव्हल सुरळीत होऊन यामुळे रक्तातील वाढलेली साखर देखील नियंत्रणात येईल.

मधुमेह नियंत्रणात आणणारा आजचा हा उपाय बनवण्यासाठी सर्वप्रथम एक पॅन किंवा भांडे घेऊन त्यात एक ग्लास पाणी घ्यायचे आहे. यानंतर आपल्याला लागणार आहेत बेलाची पाने. मित्रांनो भगवान शंकरांना वाहण्यासाठीच बेलाचा वापर होतो, एवढेच आपल्याला माहीत असते. परंतु ही बेलाची पाने आयुर्वेदातील एक उत्तम औषधी देखील आहे.

या बेलाच्या पानामध्ये व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन B1, B2 आहेत, यासोबतच व्हिटॅमिन C मुभलक असते. याशिवाय यामधील कॅल्शियम, पोटॅशियम आणि आयर्न आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. आपल्या उपायासाठी तीन ते चार बेलाची ताजी पाने मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून नंतर ती या पाण्यामध्ये टाकायची आहेत. त्यानंतर ही पाने मंद आचेवर उकळून घ्यायची आहेत.

मित्रांनो रक्तातील वाढलेली साखर आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष केले तर यामुळे रक्तवाहिन्या, डोळे, हृदय, मेंदू आणि किडनी याशिवाय मज्जासंस्थेवर मोठ्या प्रमाणात याचा दुष्परिणाम दिसून येतो. म्हणूनच ऍक्टिव्ह जीवनशैली आणि त्याचबरोबर संतुलित आहार ठेवणे तितकेच महत्त्वाचे असते.

आजकाल अनेकजण प्रिडायबेटिस स्टेज मध्ये असल्याचे आढळून येत आहे. अशा व्यक्तींनी तर वेळीच सावध होऊन आजच्या सारखे असे सोपे घरगुती उपाय केले तर पुढे दुष्परिणाम पासून आपला हमखास बचाव होईल. आपण ठेवलेले पाणी उकळून अर्धे शिल्लक राहिल्यानंतर उकळवणे थांबवून थोडे थंड होऊ द्यायचे आहे. यानंतर हे एका कपामध्ये गाळून घ्यायचे आहे. असा हा आपला उपाय तयार होईल.

हे पाणी दररोज सकाळ संध्याकाळ जेवणाआधी अर्धा तास आधी प्यायचे आहे. सलग सात ते आठ दिवस हा उपाय केल्यानंतर तुम्ही तुमची ब्लड शुगर चेक केली तर निश्चित कमी झाल्याचा अनुभव येईल. मित्रांनो या काढ्याने रोगप्रतिकारशक्ती देखील कमालीची वाढते. रक्ताची कमतरता देखील या उपायाने भरून निघते. अन्नपचन सुरळीत होऊन पचनाच्या इतर समस्या नष्ट होतात.

कोणत्याही गोष्टी करण्यापूर्वी डॉक्टरचा सल्ला घेणे कधीही उत्तमच कारण प्रत्येकाचे शरीर वेगळे असते. त्यामुळे एखादा सल्ला किंवा उपाय हा सर्वांसाठी लागू होईल असे नसते. मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *