खाज, खरूज, नायटा, त्वचारोग कितीही वर्षे जुना असुदे, एका दिवसात त्याला नष्ट करेल हा उपाय…

नमस्कार मित्रांनो खाज, खरूज, नायटा, एक्झिमा ही जी समस्या आहे ती दूर करायला खूपच उत्तम असा आयुर्वेदिक उपाय मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तुम्हाला खूप चांगली एक दिव्य औषधी बनवायला आज शिकवणार आहे., ज्यामुळे हे फंगल इन्फेकशन ते मूळापासून नाहीसे होईल. सगळ्यात पहिले हे बनविण्यासाठी तुम्हाला घ्यायची आहे तुरटी.

तुरटी ज्याला आपण फिटकरी, अलम पण म्हणतो व हिला पोटॅशियम अॅल्युमिनियम सल्फेट या नावाने पण ओळखतात. ही तीच तुरटी आहे जी पाण्याची स्वछता करायला आपण वापरतो. पूर्वीच्या काळी वॉटर प्युरिफायर नव्हते तेव्हा लोक पाणी शुद्ध कसे करत असत तर एक तुरटीचा तुकडा घेऊन ज्या भांड्यात पिण्याचे पाणी असेल त्या भांड्यात ही तुरटी चारही बाजूंनी 2 मिनिटे फिरवीत असत, नंतर तुकडा काढून घेत असत. तुरटी पाणी स्वछ करते. पाण्यातील जिवजंतु नष्ट करते.

म्हणून या उपायात मी तुरटी घेतली आहे जी कोणत्याही प्रकारच्या इन्फेकशनला नष्ट करते. पूर्वीच्या काळी लोक दाढी केल्यानंतर तुरटीच्या तुकड्याने आपल्या दाढी केलेल्या भागावर हलके चोळत असत, कारण त्यामुळे दाढी करताना कुठे जर कापले असेल, जखम झाली असेल, तर ती ठीक होत असे. खूप पूर्वीपासून तुरटी वापरली जाते आहे त्वचारोग दूर करण्यासाठी.

हे जे पोटॅशियम अॅल्युमिनियम सल्फेट आहे त्याचे आयुर्वेदात खूप जास्त महत्व आहे. ज्या लोकांना मुरूमे, डाग यांची समस्या आहे ते पण तुरटीच्या पाण्याने चेहरा जरूर धुवू शकतात किंवा तुरटीचे छोटे तुकडे चेहर्‍यावर 2 मिनिटे फिरवू शकतात. मी इथे थोडे पाणी घेतले आहे, त्यात एक छोटा तुकडा तुरटी घातली आहे. तुम्हाला कुठेही फंगल इन्फेकशन असेल, तर प्रथम तुरटीच्या पाण्याच्या मदतीने ती जागा स्वछ करा.

साधारण फंगल इन्फेकशन म्हणजेच खाज, खरूज, नायटा हे आशा ठिकाणी होते, जिथे तुम्हाला खूप जास्त घाम येतो, ज्या जागेवर बाहेरून हवा लागत नाही, जी जागा चिकट राहाते. जास्त करून हे इन्फेकशन मांड्या, जांघ्या यामध्ये होते. छोटासा तुकडा पाण्यात टाकून त्या जागेची कापसाच्या मदतीने साफ करा तुम्ही बघाल तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. कुठेही कापले, रक्त येत असेल, घाव असेल, तर तुरटी अतिशय उपयोगी आहे. त्या जागी तुरटीच्या पाण्याने धुतल्यामुळे रक्त याचे थांबते.

तोंडाच्या छाल्यांसाठी तुरटीच्या पाण्याने गुळण्या केल्या तर ते ठीक होतात. तोंडाची दुर्गंधी नाहीशी होते. फोड, पुरळ यावर याचा उपयोग होतो. त्वचारोगासाठी हे खूप फायदेशीर आहे. फंगल इन्फेकशन असेल, तर आंबट वस्तु खाऊ नयेत. चिंच, आवळा हे खाऊ नये. आंबट दही खाऊ नये. आता ती जागा साफ केली आहे त्यावर आपल्याला लावायचे आहे मलम. खूप साधे मलम मी तुम्हाला दाखवणार आहे. १ चमचा मोहरीचे तेल घ्या. मोहरीच्या तेलात अॅंटी-फंगल, अॅंटी-बकटेरियल गुणधर्म असतात. नंतर त्यात तुम्हाला हळद मिसळायची आहे.

हळद अॅंटी सेप्टिक आहे, तसेच नैसर्गिक वेदनाशामक आहे. १/२ चमचा शुद्ध हळद टाका. कोणताही त्वचारोग ठीक करण्यासाठी हळद गुणकारी आहे. पैसे खर्च न करता हा उपाय तुम्ही करू शकता. आता हे मलम त्यावर लावा. रात्रभर लावून ठेवा किंवा दिवसा लावणार असाल, तर २ तास ठेवा. एक आठवडा हा उपाय जरूर करून बघा, तुम्हाला पूर्ण फायदा मिळेल. कडुंनिंबाची पाने घेऊन ती पाण्यात उकळा, कोमट झाल्यावर त्या पाण्याने स्नान करा. त्यामुळे कोणतेही फंगल इन्फेकशन, त्वचारोग हे पाणी फायदेशीर होते. आमची ही माहिती आवडली असेल तर जरूर शेअर व लाइक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *