केस गळत असल्यामुळे त्रासलेले आहात तर कोरफड जेलचा असा उपयोग करा- काहीच दिवसात फरक दिसून येईल

आजच्या काळात जास्त करून महिला आपल्या केसांच्या गळतीमुळे हैराण आहेत. तर पावसाळ्याच्या दिवसात ही समस्या जास्त प्रमाणात बघायला मिळते. केस आपले सौदर्य वाढवितात. केसांचे सुंदर असणे स्त्रियांच्या दृष्टीने खूपच जरूरी आहे. कारण केस चांगले असतील, तर आपल्याला स्वत:मध्ये खूपच आत्मविश्वास

जाणवतो. केसांची आपण जेवढी काळजी घेऊ, तेवढी केसांची लांबी वाढेल, केसांमध्ये घनदाटपणा येईल, केसांना चमक येईल. कोरफड म्हणजेच एलोवीरा त्वचा तसेच स्वास्थ्य या दोन्हीसाठी अतिशय फायदेमंद आहे. कोरफडीमध्ये विटामीन ए, सी, ई, बी, आणि इतर जरूरी पोषक तत्वे आढळतात., जी खूपच गुणकारी आहेत.

तसेच, कोरफडीचे जेल हे केसांसाठी खूपच लाभदायी आहे. याच्या वापराने केसांच्या अनेक समस्यांपासून आपण आपली सुटका करून घेऊ शकतो. कोरफडीमध्ये काही वस्तु मिसळून तुम्ही त्याचा हेयर पॅक तयार करू शकता.कोरफड हे नवीन केस उगविण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. जे केसांच्या गळतीच्या समस्येपासून तुमची सुटका करू शकतो.

कोरफडीबद्दल तर सगळ्यांनाच माहिती असेल, की ती आपल्या केसांसाठी किती उपयोगी आहे. आपल्या घरात एखादे तरी कोरफडीचे रोप जरूर लावले पाहिजे. हल्ली बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू मिळतात, वेगवेगळी तेल मिळतात,परंतु, तुम्ही कोरफडीच्या जेलचा उपयोग जरूर करून बघा, खासकरून सकाळी केस धुण्याआधी हे आपल्या केसांवर जरूर लावा.

कोरफडीच्या जेलचा हा प्रयोग तुम्हाला आठवड्यातून २ ते ३ वेळा करायचा आहे. त्यामुळे केसांचे गळणे थांबेल, केस मूळापासून काळे होतील, केसांना मजबूती येईल, चमक येईल. त्याचबरोबर केसात कोंडा असेल, तर त्यापासून तुमची सुटका होईल.

खूपच उत्तमअसा हा उपाय आहे. खूप कमी सामनात, खूप सहजपणे आपण हा नैसर्गिक उपाय तयार करू शकतो, घरच्या घरी हेयर पॅक बनवू शकतो. तर आज आम्ही तुमच्या मदतीसाठी तुम्हाला कोरफड जेल कसे तयार करायचे त्याची पद्धत सांगणार आहोत.

अशा प्रकारे बनवा हेयर पॅक- हे बनविण्यासाठी आपण २ नैसर्गिक वस्तु घेणार आहोत. एक म्हणजे कोरफड जेल व दुसरे एरंडेल तेल. एरंडेल तेल तुम्हाला मेडिकल स्टोर मध्ये सहज मिळू शकते. तुम्ही वाटीत दोन वस्तु मिक्स करून घ्या त्या आहेत, १ मोठा चमचा
एरंडेल तेल तुम्ही या कोरफडीच्या गरात मिसळा.एरंडेल तेल नुसते कधीही केसांवर लावायचे नाही. कोरफडीत ते व्यवस्थित मिसळून घ्या. ते तेल तुमच्या केसांना कंडिशनिंग करते.

– नंतर तयार केलेले मिश्रण आपल्या केसांच्या मुळाशी म्हणजेच स्काल्पवर लावा व हलका मसाज करा. त्यानंतर १ ते २ तास हे मिश्रण केसांवर तसेच राहू द्या. २ तासानंतर हे मिश्रण पाण्याने धुवून केस स्वछ करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *