केस गळती कमी होऊन केस लांब सडक काळे होतील, हे तेल लावा, डॉ स्वागत तोडकर उपाय…

कोणालाही आपले केस गळणे किंवा टक्कल पडणे, केस पांढरे होणे किंवा केसांना चमक नसणे आवडत नाही. त्यासाठी तुम्ही हे तेल लावून तुम्ही थोडीशी मॉलिश केली व सकाळी केस धुवून टाकले तर ह्या समस्या सहज दूर होतील. केस का गळतात व केस का पांढरे होतात तर याची बरीच कारणे आहेत.

पहिले कारण म्हणजे आपला आहार. आपण पोषक आहार घेत नाही त्यामुळे केसांना आवश्यक असणारे घटक मिळत नाहीत. दुसरी गोष्ट आहे वातावरणातील प्रदूषण हल्ली वातावरणात खूप प्रदूषण वाढले आहे त्यामुळे काय होते की प्रदूषणात असणारे घटक, धूळ व विविध प्रकारचे केमिकल्स केसांची मुळे डॅमेज करतात आणि केसगळती वाढते.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच व्यक्तींच्या केसामध्ये कोंडा होतो. कोंड्यामुळे आपण डोके खाजवतो परिणामी केसांची मुळे हालतात, केस गळतात एवढेच काय केस लवकर पांढरे पण होतात. तर यासाठी हे तेल वापरले तर आपल्याला केसांची कोणतीही समस्या राहणार नाही. तेल कसे बनवायचे आणि कशापासून बनवायचे हे आपण जाणून घेऊया.

या उपायांसाठी आपल्याला दोन प्रकारचे तेल लागणार आहे. एक तेल म्हणजे “एरंड तेल ” हे तेल बाजारात सहज उपलब्ध होत, एरंड तेलामध्ये कॅल्शियम आहे, प्रोटीन आहे, ऑंटी ऑक्सीडेंट आणि ओमेगा 3 फैटी एसिड हे केसांच्यासाठी हे अतिउपयुक्त आहे. केसातील कोंडा काढण्यासाठी व केसांमधील कोरडे पणा काढण्यासाठी हे तेल खूप उपयुक्त आहे

दुसऱ्या प्रकारचे तेल आपल्याला लागणार आहे ते म्हणजे “मोहरी तेल ” ह्या तेलाला आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्व आहे मोहरीचे तेल वजन कमी करण्यासाठी कप, दमा, अस्थमा कमी करण्यासाठी, दात दुखीसाठी, भूक लागण्यासाठी ह्या सर्व कारणांसाठी आहारात वापरले जाते. पंजाब लोक ज्यास्त करून हे तेल खातात.

हेच तेल केसांच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे, यामध्ये सेलेनियम, फैटी एसिड, आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम, बीटा कैरोटीन याच बरोबर, ओमेगा 3 फैटी एसिड, एंटीऑक्सीडेंट खूप प्रमाणात असतात. याचा वापर केला तर केस मऊ राहतात, केस लांब होतात, चमकदार राहतात आणि एवढेच नाही केस वाढण्यास मदत होते.

आपणाला आता करायचं काय आहे तर एरंड तेल अर्धा चमचा व मोहरी तेल अर्धा चमचा हे दोन्ही तुम्हाला एका वाटीमध्ये मिस्क करून, एकजीव करून घ्यायचे आहे. ह्या तेलाने रोज संध्याकाळी झोपताना केसांची मॉलिश करायची आहे. ज्यास्त जोर न लावता केसांच्या मुळापर्यंत जाईल अश्या पध्दतीने मॉलिश करायची आहे आणि सकाळी ते कोमट पाण्याने धुवून घ्यायचं आहेत.

केस खूप तेलकट होत असतील तर त्यासाठी तुम्ही शाम्पू वापरू शकता. शक्यतो शाम्पू हा आयुर्वेदिक असावा हा उपाय स्त्रियांनी आठवड्यातून दोन ते तीन वेळा आणि पुरुषांनी रोज हा उपाय केला तर काहीही प्रॉब्लेम नाही. याचा कोणताही साईड इफेक्ट नाही.

यामुळे केस काळे राहतील, केस लांब होतील एवढेच काय तर केसांच्या मध्ये जो कोंडा आहे. त्या कोंड्यासाठी हे जे तेल आहे, ते अत्यंत उपयुक्त आहे. मित्रांनो हा उपाय तुम्ही घरी बनवू शकता, ह्या वस्तू तुमच्या स्वयंपाक घरांमधीलच आहेत. ह्या उपायाने तुम्ही तुमच्या केसांच्या समस्या दूर करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *