केसांना इतके काळे आणि सुंदर बनवेल हा रामबाण नैसर्गिक उपाय…

नमस्कार मित्रांनो पांढरे केस मूळापासून काळे व सुंदर बनवेल हा रामबाण नैसर्गिक उपाय. हो, मित्रांनो, एकदम आयुर्वेदिक घरगुती उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे. ज्यांचे केस पांढरे झाले आहेत ते पण हे लावू शकतात, किंवा जे केस जास्त काळे करू इछितात ते पण हा उपाय करू शकतात. तुमच्या केसांना पोषक तत्वे मिळतील, केस तुमचे मूळापासून काळे होतील, उपयोग करा सदाफुलीचा.

याला “बारमाही” किंवा “सदा सुहागन” असे म्हणतात. हे जे झाड तुम्ही पाहत आहात, जास्त करून याची फुले पांढर्‍या व गुलाबी रंगाची असतात. आपल्या क्षेत्रात पांढरी व गुलाबी फुले आढळतात. ही गावठी सदाफुली आहे, ज्याचे आयुर्वेदात खूप महत्व सांगितले आहे. ही एक औषधी वनस्पति आहे. मधुमेही रुग्णांसाठी याच्या २ पानांचे सेवन फायदेशीर आहे. यामुळे त्यांची साखर नियंत्रणात राहते. तसेच याची फुले व पाने यांची पेस्ट खाज, खरूज, किंवा त्वचारोग यावर लावल्यामुळे फायदा होतो.

यामध्ये अॅंटी इन्फ्लामेटरी गुणधर्म असतात. हे झाड अनेक आजारांवर उपयोगी आहे. बारा महीने सदाफुलीला फुले येतात. खूपच सहजपणे हे झाड उगवते. तुमच्या घराच्या जवळपास हे झाड असू शकते. जर नसेल तर जरूर लावा. खूपच औषधी वनस्पति आहे. मधुमेही लोक याची पाने सुकवून त्याची पाऊडर करून सेवन करतात. केस काळे करण्यासाठी सदाफुलीची पाने व फुले यांचा कशा प्रकारे उपयोग करायचा आहे ते मी तुम्हाला दाखवते. ज्यांचे केस काळे आहेत त्यांनी पण हे लावावे व ज्यांना केस अजून काळे करायचे आहेत व सुंदर बनवायचे आहेत त्यांनी हा नैसर्गिक उपाय करून बघावा.

यामध्ये कोणतेही रसायन नाही व याचे दुष्परिणाम नाहीत. १०० टक्के परिणामकारक हा उपाय आहे. हे औषधी गुणधर्म असलेले झाड आहे. केस काळे करण्यासाठी कोणतेही केमिकल न वापरता हा नैसर्गिक उपाय करा. माझे पण केस पांढरे आहेत मी हा नैसर्गिक उपाय करते. मी कधीही केमिकल हेयर डाय वापरला नाही. सदाफुलीमुळे केसांची मुळे मजबूत होतात. केसांचे गळणे थांबवते सदाफुलीचे झाड तसेच त्याची पाने व फुले व त्यांचा रस. मी इथे सदाफुलीची ५-६ पाने व फुले घेतली आहेत. मिक्सरवर त्याची पेस्ट बनवून घ्या.

मधुमेह नाशक आहे ही वनस्पति. १ चमचा पाणी घालून ही पेस्ट तयार करा. ही सदाफुली मधुमेही लोकांसाठी वरदान आहे. असे पण म्हटले जाते की याची पाने पाण्यात उकळून घेतल्यामुळे कॅन्सरच्या पेशी नष्ट होतात. आज आपण केसांसाठी हा उपाय करत आहोत. यामध्ये खूप जास्त क्रियाशील तत्वे असतात जी आपल्या केसांच्या मुळांना मजबूत बनवतात व काळे बनवितात. आजची सर्वात मोठी समस्या आहे केस गळणे. हल्ली वयाच्या आधी केस पांढरे होण्याची समस्या आहे.

८- ते १० सदाफुलीची पाने व फुले घेऊन त्याची पेस्ट तयार करा. केसांना जर योग्य पोषण मिळाले तर केसाची वाढ चांगली होते व केस काळे होतात. स्नान करण्यापूर्वि अर्धा तास हा रस केसांना लावून ठेवा. नंतर अर्ध्या तासांनी केस धुवून टाका. कोणताही उपाय करण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. लिंबूचा रस यामध्ये जरूर टाका २ ते ३ थेंब. ज्यांना चालत नसेल त्यांनी लावू नये. लिंबाचा रस आपली त्वचा स्वछ करतो. कोंडा असल्यावर आपले केस जास्त गळतात. नंतर त्यात नारळ तेल २ चमचे टाका. विटामीन ई ने परिपूर्ण असते नारळ तेल.

नारळ तेलात विटामीन ई भरपूर प्रमाणात असते. तुम्ही तिळाचे, ऑलिव्ह ऑइल घालू शकता. कापसाच्या मदतीने हे तेल लावा. नवीन उपाय तुम्हाला सांगितला. तुमच्या केसांची चांगली वाढ होईल. हलक्या हाताने मालीश करा त्यामुळे केसांची वाढ होते, केस गळणे थांबते. केसांची जेवढी काळजी घ्याल तेवढी केस लांब होतील, चमकदार होतील. मला जरूर कळवा हा उपाय तुम्हाला कसा वाटला. आवडला असेल तर लाइक व शेअर जरूर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *