केसगळतीवर सर्वात प्रभावी उपाय, केस गळती त्वरित बंद, पांढरे केस कायमचे काळे…

नमस्कार मित्रांनो…

आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही आणि त्यामुळे शरीरामध्ये महत्वपूर्ण व्हिटॅमिन्सची कमतरता निर्माण होते आणि त्याचा दुष्परिणाम म्हणून केस गळायला सुरुवात होते. ही समस्या पुढे पुढे वाढतच जाते. वेळीच उपाय केला नाही तर पुरुषांना टक्कल पडते आणि महिलांचेही केस खुप पातळ होतात. तर आज आपण मॅझिक हेअर ऑइल पाहणार आहोत.

हे मॅझिक हेअर ऑइल लावल्याने तुमच्या केसांचे मुळापासून पोषण होईल आणि केस मजबूत होतील. तसेच तुमचे केस गळणे बंद होईल आणि नवीन केस उगवतील. हे तेल तयार करण्यासाठी पहिला घटक घेणार आहोत कांदा. कांद्याच्या रसामध्ये औषधी गुणधर्मांचा साठा असतो. यामुळे आपल्या केसांचे खोलवर पोषण होते. तसेच केस गळती, कोंडा आणि केस तुटणे या सर्व समस्या कांद्यामुळे नष्ट होतात.

तर असा एक कांदा बारीक कापून घ्यायचा आहे. यानंतर दुसरा घटक घेणार आहोत लसूण. लसणामध्ये अँटीमायक्रोबियल गुणधर्म असतात. त्यामुळे केसांतील कोंडा नष्ट होतो. तसेच केसांच्या मुळांपाशी रक्तप्रवाह वाढतो. तर अशा लसणाच्या दहा पाकळ्या सोलून घ्यायच्या आहेत. यानंतर तिसरा घटक घेणार आहोत कढीपत्ता. यामध्ये व्हिटॅमिन B आणि C मोठ्या प्रमाणात असते. तसेच आयर्न, कॅल्शियम आणि फॉस्फरस मोठ्या प्रमाणात असते.

तर दहा कढीपत्त्याची पाने आपल्याला घ्यायची आहेत. आता हे सर्व घटक मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत. बारीक करत असताना त्यामध्ये अजिबात पाणी टाकू नये. यानंतर हे मिश्रण एक कढईमध्ये काढून घ्यायचे आहे. यानंतर पुढील महत्त्वाचा घटक घेणार आहोत मोहरीचे तेल. मोहरीच्या तेलामध्ये मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड, ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि ओमेगा 6 फॅटी ऍसिड्स असतात. त्यामुळे केसांची भरपूर वाढ होते.

तसेच मोहरीच्या तेलामध्ये अँटीफंगल आणि अँटीबॅक्टरीयल गुणधर्म असतात. त्यामुळे केसामधील कोंडा नष्ट होतो. तसेच डोक्यावर खाज येत असेल तर ती पुर्णपणे बंद होते. तर असे मोहरीचे तेल शंभर मिली घ्यायचे आहे. यानंतर पुढील घटक घेणार आहोत खोबरेल तेल. अनेक गुणधर्मांनी युक्त असलेले खोबरेल तेल केसांसाठी संजीवनीच असते. तर हे पन्नास मिली घ्यायचे आहे.

आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे आणि ही कढई गॅसवर ठेवायची आहे आणि वीस मिनिटे हे तेल गरम होऊ द्यायचे आहे. तेल गरम होत असताना ते सतत हलवत राहायचे आहे. वीस मिनिटे गॅसवर ठेवल्यानंतर हे मिश्रण खाली उतरून घ्यायचे आहे. थंड झाल्यानंतर हे मिश्रण सुती कापडाने गाळून घ्यायचे आहे. हे आपले मॅझिक हेअर ऑइल तयार झाले आहे.

हे तेल एका काचेच्या बाटलीमध्ये किंवा बरणीमध्ये साठवून ठेवायचे आहे. हे मॅझिक हेअर ऑइल रात्री झोपण्यापूर्वी केसांना लावायचे आहे आणि रात्रभर तसेच राहू द्यायचे आहे. सकाळी एखाद्या शॅम्पूने केस धुतले तरी चालतील. केसांना लावण्याच्या अगोदर थोडे गरम करून घ्यावे, जास्त गरम करू नये.

हे तेल आठवड्यातून तीन ते चार वेळा लावावे. परंतु दररोज लावले तर त्याचा लवकर रिजल्ट मिळेल. हे तेल इतके प्रभावी आहे की तिसऱ्या दिवसापासून तुमचे केस गळायचे बंद होतील आणि या तेलाच्या नियमित वापराने तुमचे केस गळणे पुर्ण बंद होईल. तसेच तुमचे पांढरे झालेले केस ही काळे होतील. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *