कुठे मिळाली बाभुळाची शेंग तर आपल्याबरोबर घेऊन या, याचे फायदे कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नाहीत

नमस्कार मित्रांनो, आज आपण बाभुळीच्या फायद्यांबद्दल बोलणार आहोत. बाभुळ एक काटेदार वृक्ष आहे. हे खूप उंच व पसरणारा वृक्ष आहे. बाभुळीचा वृक्ष सगळ्या भारतात प्रसिद्ध आहे. बाभुळ वृक्षाची पाने शमीच्या वृक्षाप्रमाणे असतात व त्याचे काटे १ ते २ इंच लांबीचे असतात. ह्याला जी फुले येतात ती पिवळ्या रंगाची, गोलाकार व गुच्छाच्या स्वरुपात असतात. जानेवारी व फेब्रुवारी या सुमारास याला शेंगा याला सुरुवात होते. ही शेंग ३ ते ४ इंच लांब, चपट व प्रत्येक शेंगेत ८ ते १२ चपट्या बिया असतात.

बाभळीचा गोंद (क्रौंध) खूप प्रसिद्ध आहे. बाभुळीच्या झाडापासून लालसर रंगाचा गोंद निघतो. बाभुळीमधून पांढर्‍या रंगाचा गोंद निघतो तो खूपच पौष्टिक व शक्तिवर्धक असतो. चला तर मग जाणून घेऊया बाभुळ याला कोणकोणत्या नावाने ओळखले जाते. बाभुळीचे संस्कृत नाव “किकिरात” आभा, बरबत आहे. बबूल, बबुर व कीकर या नावाने हिंदीत ओळखतात. याला गुजरातीमध्ये “बाबला” म्हणतात, मराठीत बाभुळ व बंगालीमध्ये “बावला व कीकर” या नावाने ओळखतात.

बाभूळीचे तामीळ नाव “कारोवेल” व पंजाबी नाव “बावळा” आहे. बाभूळचे इंग्रजी नाव “आकासिया ट्री” असे आहे व लॅटिन नाव आकासिया अरेबिका असे आहे. बाभूळाचा वृक्ष भारताच्या दक्षिण भागात आढळतो. हा गुजरात, राजस्थान, पंजाब व मध्य प्रदेश येथे विशेष रूपात उत्पन्न होतो. तसे तर बाभुळाचे झाड काटेदार असते. पण हा वृक्ष मनुष्याच्या जीवनात येणार्‍या अनेक आजारांना नाहीसे करतो.

आयुर्वेदानुसार बाभूळ हा कफशामक, पित्तशामक, रक्तपित्तशामक. याचा गोंद वात, पित्तशामक, मूत्र, गर्भाशयाच्या स्त्रोत व स्त्रावाला दूर करणारा असतो. त्याशिवाय, बाभूळ स्नेहल, बल्य, ग्राही, कृमिनाशक आहे. याची साल व शेंगा कृमिनाशक व दाह मिटविणारी आहे. आज आम्ही बाभुळीचे काही विशेष फायदे सांगणार आहोत. मित्रांनो, चला तर मग जाणून घेऊया बाभुळीचा उपयोग आपण कशा प्रकारे करून घेऊ शकतो.

आज जगातील कितीतरी लोक नपूसंकतेचे शिकार आहेत. जे लोक नपूसंकताने पीडित आहेत, त्यांच्यासाठी बाभूळ कोणत्याही वरदानापेक्षा कमी नाही. त्यासाठी बाभुळाच्या बिया सावलीत वाळवा. त्यामध्ये सम प्रमाणात खडीसाखर मिसळा. त्याची पाऊडर करा. ही पाऊडर १ चमचा सकाळी व रात्री पाण्याबरोबर सेवन केली तर काही दिवसात वीर्य दाट बनायला सुरुवात होते. याच्या सेवनाने विर्यासंबंधी सगळे विकार दूर होतात व स्वप्नदोषाची समस्या दूर होते. त्याशिवाय, बाभुळीचा गोंद खूपच प्रसिद्ध आहे.

हा तुम्हाला वाण्याच्या दुकानात सहज मिळू शकतो. बाभूळाचा गोंद आणून तुपात तळून त्याचा पाक बनवून खाल्यामुळे पुरूषांचे वीर्य वाढते. तसेच प्रसूती काळात हा पाक स्त्रियांना खायला दिल्यामुळे त्यांची शक्ति वाढते. मित्रांनो, बाभुळीच्या गोंदाला तुपात तळून त्याचे चूर्ण बनवून त्यामध्ये दुप्पट साखर मिसळून व १० ग्रामच्या मात्रेप्रमाणे दुधाबरोबर प्यायल्यामुळे विर्याचा पातळपणा दूर होऊन ते दाट होते. स्वप्नदोष ही समस्या दूर होते. तसेच शरीर बलिष्ठ बनते व अशक्तपणा दूर होतो. बाभुळाच्या ताज्या शेंगा घेऊन त्याचा रस काढा. हा रस खूपच चिकट असतो.

आता या रसामध्ये १ मोठा कपडा घेऊन ७ वेळा बुडवून तो सुकवा. नंतर हा कपडा दुधात उकळा. दूध गाळून थंड करून प्या. हे दूध खूपच पौष्टिक असते. बाभुळीच्या गोंदाचा गुणधर्म तुम्हाला माहीतच आहे हा बलवर्धक आहे. हा कंबरदुखी, अतिसार, यामध्ये खूपच लाभकारी आहे. मधुमेहाचे रुग्ण पण क्रौध म्हणजेच या गोंदाचे सेवन करू शकतात. बाभूळ कितीतरी आजारांना दूर करतो.

मासिक पाळीत अति रक्तस्त्राव होत असेल तर याचा फायदा होतो. गर्भवती महिला बाभुळीच्या कोवळ्या पानांचे चूर्ण बनवून २ ते ४ ग्राम एवढे नियमित सकाळ संध्याकाळ घेतल्यामुळे सुंदर व सतेज कांतीच्या बाळाची प्राप्ती होते. वरील कोणताही इलाज वैद्याच्या सल्ल्याशिवाय करू नये. आमची माहिती आवडली असेल तर लाइक व शेअर करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *