Thursday, November 24
Shadow

कुठे आहे शिवछत्रपतींचे 32 मण सुवर्ण सिंहासन ? कोणी गायब केले ?

6 जून 1674 स्वराज्याच्या गौरवशाली इतिहातील सोनेरी दिवस याच दिवशी विश्व वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ले रायगड वरती राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. शिवराय हिंदवी स्वराज्याचे पहिले छत्रपती झाले, 32 मनाच्या सोनेरी सिंहासनावरती विराजमान झाले सगळ्या जातीधर्माच्या रयतेच कष्टकऱ्यांच कामकऱ्यांच, शेतकऱ्यांच बहुजनांच राज्य अस्तित्वात आलं. पारतंत्र्याचा अंधकार दूर करून ज्या शिवरायांनी रयतेला स्वातंत्र्यची पाहट दाखवली त्याच शिव छत्रपतींना 32 मनाच्या सुवर्ण सिंहासनावरती विराजमान होताना पाहून रयतेचा उर अभिमानाने भरून येत होता. हे तेच सिंहासन ज्या सिंहासनान बलदंड मोघली सत्तेला आव्हान दिलं.

हे तेच सिंहासन ज्या सिंहासनावर बसून शिवरायांनी रयतेला विश्वास दिला पण आज 350 वर्षानंतर प्रत्येक शिव भक्ताला पडलेला प्रश्न आहे. कुठे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे 32 मनाचे सुवर्ण सिंहासन..! अखेर कोणी गायब केले हे सुवर्ण सिंहासन.. बांधवांनो प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी थोडा इतिहास आधी जाणून घेऊ. सन 1689 हे वर्ष मराठ्यांच्या इतिहासासाठी स्वराज्याच्या भवितव्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुटुंबीयांसाठी आणि महाराष्ट्रातील रायतेसाठी सुद्धा अत्यंत वेदनादायी ठरले. या वर्षाची सुरवातच स्वराज्याला प्रचंड मोठा धक्का देणारी ठरली, स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना दगा फटका करून कैद करून त्यांची हत्या करण्यात आली.

स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम राजेंना प्रतापगड, पन्हाळगड, विशाळगड जिंजी अशा किल्ल्यांवर सतत धावपळ करावी लागली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुटुंबियांना छत्रपतींसकट कैद करायचं या हट्टाला पेटलेल्या औरंगजेबाने जुल्फिकार खानाला थेट रायगड काबीज करायला पाठवलं…! कारण अखंड हिंदुस्थानमध्ये औरंगजेबाला टक्कर देऊ शकेल, औरंगजेबाला आव्हान देऊ शकेल असे एकच राज्य होतं ते म्हणजे स्वराज्य…! आणि या स्वराज्याची राजधानी होती किल्ले रायगड त्याच ठिकाणी 32 मनाचं सुवर्ण सिंहासन होतं.

शंभू राज्यांच्या मृत्यू नंतर राजाराम राजेंना जिंजीला जायला सांगून येसूबाई राणी सरकारांनी तब्बल 8 महिने मुघलांशी झुंज देत रायगड लढवला, पण शेवटी मोघलांच्या संख्या बळासमोर माघार घ्यावी लागली. मोघलांनी रायगडावरती ताबा मिळवत येसूराणी, बाळ शाहूराजे, रायगडावर्ती असलेलं छत्रपतींच कुटुंब कैद केलं. औरंगजेबाने दिलेल्या आज्ञेवरून रायगडावरती असणारे सोने, चांदी, मौल्यवान वस्तू पेट्यांमध्ये भरून मोघल घेऊन गेले. साखी मुसतेदखान आपल्या मासिर येथील आरमगिरी मध्ये औरंगजेबाने रायगडावरील मालमत्ता जप्त करण्यास सांगितले होते, असे लिहून ठेवतो यावरून अंदाज येतो कदाचित सिंहासन जप्त केले गेले असावे.

पण त्याचे पुढे काय झाले हे कोणालाच माहीत नाही, तर काही इतिहासकरांच्या मते रायगड ताब्यात आपल्यावर मुघलांची नजर गेली शिव छत्रपतींच्या 32 मनाच्या सुवर्ण सिंहासनावरती हिरे मोती माणके जडवलेले ते सुवर्ण सिंहासन मोघलांच्या डोळ्यात खुपत होतं. त्या सिंहासनावरती घणाचे घाव घालून जुल्फिकार खानाने ते सिंहासन फोडलं, पण त्यातील काही भाग फुटत न्हवता त्यावेळी उरलेल्या काही भागावर आग लावली गेली. आगीचे लोळ तयार करून ते सिंहासन वितळवण्यात आलं, छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासन मोघली लांडग्यांनी उध्वस्त केलं.

स्वराज्याच सिंहासन मोघलांना उध्वस्त केलं पण स्वराज्य उध्वस्त करण्याच्या नादात अख्खी मुघलशाही उध्वस्त झाली. मावळे पेटून उठले ज्यांनी आमचे तक्त फोडलं त्यांचं रक्त याच मातीत सांडलं, संताजी, धनाजी, विठोजी, अशा अनेक शूरवीरा मावळ्यांनी मोघलांना अक्षरशः सळो की पळो करून सोडून स्वराज्य मोघलांपासून अबाधित ठेवले. मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. व अशीच नवनवीन माहिती वाचण्यासाठी आमच्या marathi asmita या पेजला नक्की लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published.