कितीही पांढरे झालेले केस ३ दिवसात कायमचे काळे करा या आयुर्वेदिक उपायाने…

आज तुम्हाला पांढरे केस काळे करण्याचा एक असा उपाय सांगणार आहोत ज्याचा कोणताही वाईट परिणाम होत नाही. तुमचे केस वयानुसार पांढरे झाले असतील किंवा वेळेआधी पांढरे झाले असतील तरीही या उपायाने ते काळे होतील. केस काळे करण्यासाठी कधीही रासायनिक रंग वापरू नका. हा घरगुती उपाय १०० टक्के खात्रीशीर असून याचा कोणताही साइड इफेक्ट नाहीये.

यासाठी सगळ्यात आधी आपल्याला चहाची पावडर घ्यायची आहे. तुम्ही वापरत असलेल्या कोणत्याही कंपनीची चहा पावडर तुम्ही घेऊ शकता. एक चमचा चहा पावडर घ्या. चहाच्या पावडरचे दाणे थोडे मोठे असतील तर ते कुटून अगदी बारीक करून घ्या. आपण चहा पावडर फक्त चहा करण्यासाठीच वापरतो. पण ही एक उत्कृष्ट सौन्दर्यवर्धक आहे.

हीच वापर आपण आपल्या त्वचेवर आणि केसांवरही करतो. चहा पावडर बारीक कुटून चेहऱ्यावर स्करब प्रमाणे वापरल्यास चेहऱ्यावर छान चकाकी येईल. केसांवर ही पावडर वापरल्यास केस लांब, काळे, मजबूत होतात व त्यावर चकाकी येते. निस्तेज केसही चमकू लागतात.

एक चमचा चहाची पावडर बारीक कुटून घ्या. केसात अडकू नये म्हणून याची बारीक पावडर करून घ्या. चहा पावडर मध्ये अॅंटी एनफलमेटरी, अॅंटी बकतेरियल गुण असतात. जे आपल्या त्वचेसाठी, केसांसाठी फायदेशीर असतात. मुले, मुली दोघेही हा उपाय वापरू शकतात. यात आपण अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे. लिंबाचेही अनेक फायदे आहेत.

कोंडा, इन्फेक्शन दूर करायला लिंबू मदत करते. चहा पावडर व लिंबाचा रस व्यवस्थित एकत्र करून घ्या. आठवड्यातून दोनदा हा उपाय वापरा. या उपायाने पांढरे केस नक्कीच काळे होतील. केस धुण्याच्या अर्धा ते एक तास आधी हे मिश्रण केसांना लावा. या मिश्रणात आता आवळ्याचे तेल घालायचे आहे.

आवळा केस काळे करतो, कोंडा घालवतो, केसांना मूळापासून मजबूत करतो, केस गळणे थांबवतो, केसांना पोषण देतो. केसांना कंडिशन करतो, रेशमी बनवतो. पांढरे केस काळे करण्यासाठी आवळ्याचे तेल हे एक वरदानच आहे. चहा पावडर व लिंबाच्या मिश्रणात दोन चमचे आवळ्याचे तेल घाला. हे मिश्रण नीट एकजीव करून घ्या.

गरज लागल्यास थोडेसे आणखी तेल घाला. तुमचे केस मोठे असतील तर त्यानुसार थोडेसे जास्त तेल घ्या. आवळ्यात भरपूर सी विटामीन असते. त्यामुळेच केस मजबूत होतात, गळत नाहीत. यानंतर यात काळे जीरे घालायचे आहे. हे काही ठिकाणी लोणचे, मुरांबा, चटणीसाठी वापरले जाते. याचे अनेक औषधी गुणधर्म आहेत.

यात भरपूर प्रोटिन, विटामीन बी १, २, ३ , कॅल्शियम, आयर्न, फॉस्फरस असते. हे केसांना मजबूत बनवते. एक चमचा काळे जीरे घेऊन त्याची पावडर करा व ती आपण तयार केलेल्या मिश्रणात घाला. हे मिश्रण आठवड्यातून दोनदा केसांना लावा व केस धुवून टाका. तुमचे केस नक्कीच काळे, मजबूत होतील.

माहिती आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका.. अशाच पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *