कितीही पांढरे केस झटपट काळे होतील या पौराणिक आयुर्वेदिक उपायाने…

नमस्कार मित्रांनो कितीही पांढरे झालेले केस काहीही खर्च न करता अगदी घरच्या घरी या उपायाने करा काळे. कोणत्याही साईड इफेक्ट शिवाय. मित्रांनो आजकाल आपण पाहतो वृद्ध व्यक्तीचेच नाही तर तरुण व्यक्तींचे अगदी लहान मुलांचे केस देखील पांढरे होताना दिसतात. केस पांढरे होण्याचे मुख्य करण म्हणजे अतिप्रमाणात मानसिक ताणतणाव, प्रदुषण, साबण, शाम्पू, यांचा अतिप्रमाणात केलेला वापर आणि विशेष म्हणजे अवेळी खाणे पिणे आणि झोपणे आणि जागरण जास्त प्रमाणात करणे या गोष्टींचा परिणाम केस पांढरे होण्यात होत असतो.

आपण केस काळे करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे शाम्पू, केमिकल, अजूनही वेगवेगळ्या प्रकारचे उपाय आपण करत असतो. या मुळे काही लोकांवर फरक पडतो तर काही जणांना याचे साईड इफेक्ट भोगावे लागतात. मित्रांनो तुमचेही केस पांढरे झाले असतील तर बाजारातील केमिकल चा वापर न करता आपण जर घरगुती उपाय केले तर आपले केस काळे होण्यास मदत होते. केस काळे होण्याचे काम आपल्या शरीरातील मेलालिन हे करत असत. मात्र मेलालिन ने जर नवीन पेशी करण्याचं काम केले तर आपले केस पांढरे होण्यास मदत होते. चला तर मग पाहुयात असा हा बहुगुणी उपाय…

तर मित्रांनो या उपायासाठी आपल्याला लागतो थोड्या प्रमाणात कडीपत्ता. आपल्याला वाळलेला कडीपत्ता घ्यायचा आहे. कडीपत्ता वाळवून घेतल्यानंतर त्याची बारीक पूड करून घ्यायची आहे. ही पूड आपल्याला खूप बारीक करून घ्यायची आहे. जास्त मोठी पूड चालणार नाही. याबरोबरच आपल्याला दुसरा घटक जो लागतो तो आहे आवळा पावडर. मित्रांनो ‘क’ जीवन सत्वाने परिपूर्ण असणारे आपले केस मजबुत करण्यासाठी केस काळे करण्यासाठी केसांची वाढ होण्यासाठी अत्यंत गुणकारी असणारी ही आवळा पावडर आपल्याला लागणार आहे.

तिसरा व महत्वाचा घटक लिंबू. तर सर्वप्रथम आपण कडीपत्याची बनवलेली एक चमचा पावडर घेणार आहोत. तेवढ्याच प्रमाणात आवळा पावडर घ्यायची आहे. आता या मध्ये महत्वाचा आणि मुख्य घटक ऍड करायचा आहे लिंबू. या लिंबू चा रस आपल्याला त्या मध्ये पिळायचा आहे. ही पेस्ट बनवण्यासाठी पाण्याचा वापर करायचा नाही. फक्त आपल्याला लिंबू चा रस वापरायचा आहे पेस्ट बनवण्यासाठी.

साधारणपणे केसांना लावता येईल अशी पेस्ट आपल्याला बनवायची आहे. आता ही पेस्ट तयार झाल्यानंतर 1 तास भिजत ठेवायची आहे. 1 तासानंतरच आपल्याला ही पेस्ट केसांना लावायची आहे. हे मिश्रण आपल्याला अंघोळ करण्याच्या अगोदर 1 तास लावायचे आहे. आपल्याला हे मिश्रण जिथे जास्त केस पांढरे झाले आहेत तिथे मुळापर्यंत हे मिश्रण लावायचे आहे.

आपल्याला हे मिश्रण एक तास सुखेपर्यंत ठेवायचे आहे. आणि नंतर एक तासाने आपल्याला आपले केस धुऊन घ्यायचे आहेत. हे केस आपल्याला साध्या पाण्याने धुऊन घ्यायचे आहेत. तर मित्रांनो साधारण आठवड्यातून दोन वेळा जरी तुम्ही हा उपाय केला तरी तुम्हाला याचा नक्की फरक जाणवेल. हा उपाय तुम्ही नक्की करून पहा. उपाय आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *