काही सेकंदात झोप येईल, गाढ व शांत झोपेचा डॉ स्वागत तोडकर यांचा उपाय !

फक्त या मिश्रणाचा वापर करा आणि अनिद्रेच्या समस्या, झोप न येणे या समस्यांपासून अगदी सहजतेणे घरच्या घरी लगेचच सुटका करा. अशा या समस्या टेंशनमुळे, जास्त दगदग केल्यामुळे किंवा वाढत्या वयानुसार देखील होतात.

तर अशा समस्या तुम्हाला देखील असतील, तर या समस्यांपासून सुटका करण्यासाठी जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुमच्या अनिद्रेच्या झोप न येण्याच्या समस्या अगदी सहजपणे निघून जाण्यास मदत होणार आहे.

यासाठी आपल्याला लागणार आहे हिरवी वेलची. फक्त एक वेलची घ्यायची आहे व याचे दाणे काढून घ्यायचे आहेत. हे दाणे थोडे बारीक करून घ्यायचे आहेत. हिरव्या वेलची मध्ये कार्बोहायड्रेटस, फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, आयर्न, फॉस्फरस ही तत्वे भरपूर प्रमाणात असतात. यासोबतच अशी बरीच तत्वे यामध्ये असतात की जी आपल्या शरीराकरता खुप उपयुक्त ठरतात.

ही पावडर एका वाटीमध्ये काढून घ्या आणि यामध्ये एक छोटा चमचा जायफळ व दालचिनीची पावडर टाका. एक कप गाईचे किंवा म्हशीचे दूध कोमट करून यासाठी घ्यायचे आहे आणि आपण तयार केलेली पावडर यामध्ये टाकायची आहे. हे मिश्रण छान मिक्स करून घ्या. जायफळ मध्ये व्हिटॅमिन A, B, C ही तत्वे भरपूर प्रमाणात असतात.

दालचिनी देखील आपल्या शरीरासाठी तितकीच महत्त्वाची व उपयुक्त ठरली आहे. यानंतर या मिश्रणामध्ये अर्धा चमचा भरून मध टाकायचा आहे आणि हे छान मिक्स करून घ्या. मधामध्ये देखील व्हिटॅमिन्स, खनिजे, अमिनो आम्ल ही तत्वे भरपूर प्रमाणात असतात. यामुळेच मध देखील आपल्या शरीराकरिता तितकेच उपयुक्त आणि फायदेशीर ठरते.

या मिश्रणाचा वापर करताना रात्री जेवणानंतर झोपण्यापूर्वी प्रथम तळपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि तळपायांना साजूक तुप असो किंवा खोबरेल तेल असो राईचे किंवा बदामाचे तेल कुठलेही तेल तुमच्याकडे असेल ते कोमट करून घ्यायचे आहे आणि त्या तेलाने पाच मिनिटे दोन्ही तळपायांना मसाज करायचा आहे आणि त्यानंतर हे दूध कोमट असताना पिऊन घ्यायचे आहे. यामुळे तुम्हाला लगेचच झोप लागेल.

तीनच दिवसांत तुम्हाला लगेचच फायदा जाणवणार आहे आणि पुढे देखील सात दिवस हा उपाय करू शकता. सात दिवस हा उपाय केल्यानंतर हा उपाय तुम्ही बंद जरी केला तरी देखील तुमच्या अनिद्रेच्या समस्या निघून जाण्यास मदत होते.

परंतु पुढे देखील अधून मधून तळपायांचे मसाज करत चला व याप्रमाणे हे पेय देखील तयार करून याचा देखील वापर करत चला. यामुळे तुम्हाला अनिद्रेच्या समस्या सहजतेणे कधी निघून गेल्या हे देखील समजणार नाही.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *