चेहरा इतका गोरा होईल की चारचौघात उठून दिसाल, काळी मान होईल गोरी…

आज आपण असा एक उपाय पाहणार आहोत ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स निघून जाणार आहेत, तसेच चेहरा गोरा तर होईलच पण त्याचबरोबर चेहरा तेजस्वी होईल. चेहरा गोरा होण्यासाठी तसेच चेहऱ्यावरील पिंपल्स नष्ट होण्यासाठी तुम्ही या आधी अनेक उपाय करून पाहिले असतील. हा उपाय करण्यासाठी पहिला घटक लागणार आहे मुलतानी माती.

भारतात शेकडो वर्षांपासून त्वचेच्या सौंदर्यासाठी मुलतानी मातीचा वापर केला जाई. जेव्हा कॉस्मेटिक बाजारात उपलब्ध नव्हते तेव्हा पासूनच भारतीय महिला आपल्या त्वचेसाठी मुलतानी माती वापरत आलेल्या आहेत. बाजारातील महागडी क्रीम सुद्धा त्वचेला अपाय करते, पण मुलतानी मातीपासून कोणत्याही प्रकारचा अपाय होत नाही.

मुलतानी मातीमध्ये मॅग्नेशियम क्लोराइड असते ज्यामुळे पिंपल्स आणि त्वचेवरील डाग नष्ट होतात. ज्यांची त्वचा तेलकट असते त्यांच्या त्वचेवरील अनावश्यक तेल ही माती शोषून घेते आणि नवीन पिंपल्स येण्यास अटकाव करते. अशी ही मुलतानी माती दोन चमचे घ्यायची आहे. यानंतर दुसरा घटक घेणार आहोत बटाट्याचा रस.

कच्च्या बटाट्याच्या रसामध्ये पोटॅशियम, सल्फर आणि कॉपर हे महत्त्वाचे घटक असतात. त्यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य अधिकच खुलते. तर यासाठी एक कच्चा बटाटा सोलून घ्यायचा आहे आणि त्या बटाट्याचे बारीक बारीक तुकडे करून मिक्सरमधून त्याची पेस्ट करून घ्यायची आहे व ही पेस्ट सुती कापडाच्या साहाय्याने गाळून घ्यायची आहे. असा हा आपला बटाट्याचा रस तयार होईल.

हा तयार झालेला रस मुलतानी मातीमध्ये टाकायचा आहे. तिसरा घटक घेणार आहोत लिंबु. लिंबामध्ये नैसर्गिक अँटीसेप्टिक गुणधर्म असतात. त्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स, सुरकुत्या पुर्णपणे नष्ट होतात. लिंबूमध्ये मुळातच नैसर्गिक ब्लिचिंग गुणधर्म असतात. लिंबामुळे तुमची त्वचा उजळ होते. तर असे गुणकारी अर्धे लिंबू पिळून घ्यायचे आहे.

यानंतर चौथा आणि शेवटचा घटक घेणार आहोत मध. मधामध्ये व्हिटॅमिन A ,B,C आणि आयर्न मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स नष्ट होतात. तसेच चेहरा उजळतो. असा हा गुणकारी मध अर्धा चमचा टाकायचा आहे. हे चारही घटक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर चेहऱ्यावर गोलाकार पद्धतीने लावायचे आहे.

संपूर्ण चेहऱ्यावर या मिश्रणाचा लेप लावायचा आहे. हा लेप लावल्यानंतर चेहरा वीस मिनिट तसाच राहू द्यायचा आहे. वीस मिनिट चेहरा तसाच ठेवल्यानंतर नॉर्मल थंड पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा आहे. पहिल्या वापरानंतर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये खुप फरक जाणवेल. तुमचा चेहरा त्वरित उजळून निघेल. तर असा हा उपाय तुम्ही दररोज करू शकता.

या उपायामुळे तुमच्या चेहऱ्यावर कोणताही साईड इफेक्ट होत नाही. हा उपाय शंभर टक्के नॅचरल आणि सुरक्षित आहे. हा उपाय दररोज केल्याने सात दिवसात तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होतील. तसेच चेहरा उजळून निघेल. चेहऱ्यावर एक प्रकारचा नॅचरल ग्लो येईल. ज्या भगिनींना काळी मान गोरी करायची असेल त्यांनी चेहऱ्याबरोबर हे मिश्रण मानेवर लावायचे आहे.

ज्यांना हा उपाय दररोज करणे शक्य नसेल त्यांनी आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा हा उपाय जरूर करावा. तर असा हा उपाय महिलांसाठीच नाही तर पुरुषांसाठी सुद्धा खूपच उपयुक्त आहे. ज्या पुरुषांच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात त्यांच्या साठी हा उपाय खुपच उपयुक्त आहे. हा उपाय केल्याने चेहऱ्याची त्वचा चमकदार व गोरी होते. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *