कर्ज कितीही मोठी असू द्या, उद्याच्या शनिवारी करा हा उपाय…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो आज आम्ही तुम्हाला असा उपाय सांगणार आहोत की जो उपाय केल्याने आपल्या जीवनातील मोठ्यात मोठे विघ्न असुदे, शनीची साडेसाती असुदे, मोठ्यातील मोठे संकट असुदे, जर फार कर्ज झाले असेल आणि ते कर्ज फिटत नसेल तर या उपायाने आपले कर्ज फिटेल. शनीच्या साडेसातीचा प्रभाव संपून जाईल. तसेच आपल्यावरील संकट, विघ्न संपून जातील.

मित्रानो हा उपाय खूपच जबरदस्त आहे. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करायचे आहे. तर मित्रांनो आपल्याला थोडीशी काळी उडीद घ्यायची आहे. काळ्या उडदाचे अखंड दाणे अगदी थोडेसे म्हणजे मूठभर होतील इतके दाणे आपण घ्यायचे आहेत. हे दाणे एखाद्या वाटीमध्ये ठेऊन ही वाटी आपल्या समोर ठेऊन आपण शुक्रीमुद्रा करून बसायचे आहे. जमिनीवर बसू शकत नसाल तर खुर्चीवर देखील बसू शकता. बसल्यानंतर शुक्रीमुद्रा करायची आहे. शुक्रीमुद्रा म्हणजे आपले दोन्ही हात दोन्ही गुडघ्यावर सरळ ठेवावेत.

आपले तळहात आकाशाच्या दिशेने असतील असे आणि या नंतर हाताची पाची बोटे एकत्र जुळवावी. म्हणजे आपल्याला हाताचा आकार मोदकासारखा होईल. तर मित्रांनो आपण शुक्रीमुद्रा करून शांत बसायचे आहे. व काळ्या उडदीचे दाणे आपल्या समोर ठेवायचे आहे. शुक्रीमुद्रा करून बसल्यानंतर दहा वेळा प्राणायाम करायचे आहे. म्हणजे मोठा दीर्घ श्वास घ्यावा व जितका वेळ शक्य असेल तितका वेळ श्वास रोखावा आणि मग श्वास हळूहळू सोडायचा आहे.

त्यानंतर आपल्या दोन्ही भुवयांच्या मधोमध पिंच करायचे आहे म्हणजे थोडे चिमटायचे आहे. अश्या प्रकारे दहा वेळा श्वासो श्वास करावा. असे केल्याने आपली मानसिक अवस्था सामान्य होते. आपल्या मनावरील ताण हलका होतो. मन शांत राहते. यानंतर ही काळी उडीद समोर ठेऊन शनीमंत्राचा जप करायचा आहे. हा जप आपण दहा मिनिटे करायचा आहे.

मंत्र असा आहे “ओम शं शनैचराय सूर्य पुत्राय नमः”. या मंत्राचा आपण दहा मिनिटे जप करायचा आहे. मित्रांनो हा उपाय शनिवारच्या दिवशी सकाळी करायचा आहे. अखंड काळे उडीद समोर ठेऊन “ओम शं शनैचराय सूर्य पुत्राय नमः” या मंत्राचा आपण दहा मिनिटे जप करायचा आहे. जप करून झाल्यानंतर या उडदाच्या दाण्यांमध्ये थोडे पाणी घालावे. हे दाणे पाण्यामध्ये पूर्णपणे भिजू द्यावेत. भिजून ते पूर्णपणे फुलू द्यावेत.

सकाळी जप करून झाल्यानंतर हे दाणे संध्याकाळ पर्यंत फुलून जातील. हे दाणे पूर्ण फुलून झाल्यावर आपण किंव्हा आपल्या घरातील कोणत्याही स्त्री कडून या उडदाच्या दाण्यांचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यावे. जसे आपण वडे बनवतो त्याचप्रमाणे त्याचे छोटे दोन गोळे बनवून तेलामध्ये तळून वडे बनवावे. वडे झाल्यानंतर ते वडे एका कागदावर ठेवावेत. व त्यावर थोडा सिंदूर म्हणजे अष्टगंध घालायचा आहे.

अष्टगंध घातल्यानंतर त्यावर थोडे दही घालायचे आहे. हे सर्व करून झाल्यावर हे वडे घेऊन आपण आपल्या आसपास असणाऱ्या पिंपळाच्या झाडाजवळ जायचे आहे आणि तो कागद आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली ठेवायचा आहे. मित्रांनो सर्वात महत्वाचे म्हणजे ही क्रिया करत असताना आपण कोणाशीही बोलू नये.

आपल्या सोबत असणाऱ्या व्यक्तीशी किंव्हा वाटेत भेटणाऱ्या व्यक्तीशीही बोलू नये. ती वस्तू आपण पिंपळाच्या झाडाखाली ठेवावी. व हात झोडून नमस्कार करावा आणि मागे वळून सरळ आपल्या घराकडे यावे. घरी आपल्यानंतर हात पाय धुऊन मग आपण बोलू शकता. मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला हा उपाय सात शनिवार करायचा आहे. सात शनिवार हा उपाय केल्याने शनी देवांच्या संबंधित सर्व दोष संपून जातील.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका. धन्यवाद!.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *