कधी स्वप्नातसुद्धा विचार केला नसेल की, पेरुच्या पानांमुळं हे आजार मुळापासून गायब होतात…

नमस्कार मित्रांनो. सकाळी सकाळी रिकाम्या पोटी जर तुम्ही ३ दिवस सतत पेरूची कोवळी पाने खाल्ली तर बघा काय होते. एक तर पिकलेले पान असते जे गडद हिरव्या रंगाचे असते व एक अगदी पातळ पान असते, म्हणजेच कोवळे जे हलक्या हिरव्या रंगाचे असते. हे जे कोवळे हलक्या हिरव्या रंगाचे पान असते, त्याचे सेवन करण्याविषयी आज मी सांगणार आहे या माहितीमध्ये. याचे इतके उत्तम, जबरदस्त व अजब फायदे आहेत ज्याची तुम्ही कल्पनाच करू शकणार नाही.

मित्रांनो, लठ्ठपणाची समस्या असुदे, किंवा पुरुषांमध्ये विर्याची कमतरता असुदे, महिलांमध्ये मासिक पाळीच्या समस्या असुदे, केसांच्या गळण्याची समस्या असुदे, चेहर्या वर तजेलदारपणा राहत नसेल, मुरूमे, डाग होत असतील, तसेच रक्त साफ नसेल, हाडांमध्ये कमजोरी असेल, शारीरिक दुर्बलता असेल, थकवा खूपच जास्त प्रमाणात असेल, तर ही आमची माहिती शेवटपर्यंत जरूर समजून घ्या. आमच्या ही माहिती आवडली तर जरूर लाइक व शेअर करा. आम्हाला तुम्ही लाइक केले तर पैसे मिळत नाहीत पण आमचा उत्साह वाढतो जर तुम्ही माहितीला लाइक केले तर.

चला तर मग जाणून घेऊया ही पाने कशा प्रकारे खायची आहेत. त्याचे काय काय फायदे आहेत. कोणत्या विभिन्न प्रकारच्या आजारांमध्ये ह्याचा कसा उपयोग करायचा आहे. तुम्ही महिला असाल, किंवा पुरुष असाल, तुम्हाला केस गळण्याची समस्या असेल, केस पातळ झाले असतील, केसांना दोन तोंडे असतील, केस खूप जास्त प्रमाणात गळत असतील, तर महिला असो किंवा पुरुष याचा प्रयोग कसा करायचा आहे ते आपण बघणार आहोत.

पेरूचे एक मोठे ताजे पान घेऊन ते धुवून ते पान पाटा वरवंटा ज्यावर आपण चटणी करतो, त्यावर चांगल्या प्रकारे वाटून त्याची चटणी किंवा पेस्ट तयार करायची आहे. त्यामध्ये आंबट दही किंवा ताक घाला. थोडीशी मुलतानी माती म्हणजेच १/२ चमचा घालून त्यात १/२ चमचा कडुनिंबाच्या पानांची पाऊडर, जी तुम्हाला आयुर्वेदिक दुकानात सहज मिळेल, ती घालायची आहे त्याचबरोबर १ ते २ थेंब मोहरीचे तेल किंवा नारळ तेल मिक्स करून ही पेस्ट केसांमध्ये अर्धा तास लावून ठेवा. आठवड्यातून एक वेळा किंवा दोन वेळा हा प्रयोग केला, तर केसांना खूप जास्त प्रमाणात मजबूती मिळते, पोषण मिळते व केस परत याला सुरुवात होते.

चला तर मग दूसरा प्रयोग जाणून घेऊया. मित्रांनो, तुम्हाला जर विर्याची कमतरता असेल, तर पेरूचे एक छोटे ताजे पान घ्या. ते अश्वगंधा चूर्ण व खजूर याबरोबर खा. एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ह्याचा प्रयोग फक्त आठवड्यातून ३ वेळाच करायचा आहे. त्यापेक्षा जास्त नाही. ३ दिवस एक एक दिवस सोडून हा प्रयोग करायचा आहे. याशिवाय मित्रांनो, पोटाच्या सगळ्या प्रकारच्या समस्यांमध्ये पेरूची पाने रामबाण उपाय आहे. बद्धकोष्टता, पोट खराब होण्याची समस्या, खाल्लेले शरीरात पचन न होण्याची समस्या यापासून आठवड्याभरात तुम्हाला फायदा जाणवेल.

पेरूची पाने पाण्यासोबत उकळून ते पाणी प्यायल्याने दातांचे आरोग्य उत्तम राहते. दातांच्या समस्यांसाठीही पेरुच्या पानांची पेस्ट उपयुक्त असते. दातांच्या मजबूतीसाठी महत्त्वपुर्ण पर्याय आहे. शरीरातील गाठींवर पेरुच्या पानांची पेस्ट करुन ती लावल्यास त्याचा चांगला उपयोग होतो. त्यामुळे सूज कमी होण्यास मदत होते. शरीरात विविध कारणांनी झालेल्या गाठींवरील उपाय म्हणूनही पेरुच्या पानांचा वापर केला जातो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *