जाणून घ्या कच्च्या कांद्याचे तेल घरी कसे बनवू शकता.. फायदे जाणल्यावर पायाखालची जमीनच सरकेल…

नमस्कार मित्रांनो,

आजचा माहिती त्या लोकांसाठी आहे जे केस गळतीच्या त्रासाने हैराण आहेत. त्यांनी खूप प्रकारची रसायने वापरली असतील किंवा त्यांना केस पातळ झाल्यामुळे केस गळती झाली आहे किंवा खूप केसांवर प्रयोग करून बघितल्यामुळे, हेयर ट्रीटमेंट घेतल्यामुळे केस पातळ होऊन तुटू लागले असतील तर आजच्या माहितीमध्ये आपण कांद्याच्या रसापासून तेल कसे तयार करायचे ते बघणार आहोत.

बाजारात तयार तेल मिळते पण आता उपलब्ध नाही. म्हणून आपण कांद्याच्या रसापासून तेल कसे तयार करायचे ते बघणार आहोत. आपण तेल बनविण्याआधी कांद्याच्या रसाचा काय फायदा आहे ते
बघूया. कांद्याच्या रसात सल्फरचे प्रमाण खूप जास्त आढळले आहे, जे आपल्या केसांसाठी व टाळूसाठी (केसांच्या त्वचेसाठी) खूपच फायदेशीर आहे. आपले केस केरोटीन नामक घटकापासून बनतात. ज्यामध्ये एक सल्फरिक घटक आहे.

त्यामुळे तो आपल्या केसांना खूप चांगला फायदेमंद होतो. केसांना न्यूट्रीएंट मिळत नाही ते त्यापासून मिळते. आपले रक्ताभिसरण सुरळीत ठेवतो. सल्फर आपल्या केसांचे रक्ताभिसरण वाढवते. कांद्याचा केसांवर उपयोग केल्यामुळे टक्कल पडण्याची समस्या, केस गळण्याची समस्या कमी होत जाते. कांद्याचा रस जिथे रक्ताभिसरण होत नाही तिथे ते सुरू करतो. आता बोलूया, कांद्याच्या रसाचे तेल कसे बनवायचे त्याबद्दल.

सगळ्यात प्रथम कांदा सोलून साले काढून टाकणे. नंतर त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत. ते मिक्सर जार मध्ये घेऊन त्यात २ ते ३ चमचे तेल घालणे आहे. नारळ तेल किंवा कोणतेही तेल चालू शकते. आता मिक्सरवर हे वाटून घ्या. बारीक करायचे आहे. नंतर पॅनमध्ये थोडे तेल घालून हे मिश्रण
शिजवायचे आहे. पूर्ण शिजले की खाली उतरून थोडे थंड करून कॉटनच्या कपड्याने गाळून घ्यायचे आहे.

नंतर ते एका काचेच्या बाटलीत भरणे. आता आपले कांद्याचे तेल तयार आहे. जर याच्या वापराबद्दल बोलायचे झाले, तर तुम्ही आठवड्यातून २ ते ३ वेळा हे केसांना मुळापर्यंत लावू शकता. नियमित लावू
शकता पण वेळ नसेल तर रात्री तेल लावून मालीश करा व रात्रभर तसेच राहू द्या. सकाळी केस धुवून टाका. केस तुटण्याच्या समस्येवर हे उपयोगी आहे.

तुमच्या केसात कोंडा होण्याची समस्या असेल तरी याचा उपयोग होतो. यामध्ये अॅंटी-ओकसिडेंट गुणधर्म आहेत. केस घनदाट करण्यासाठी, केसांची वाढ होण्यासाठी हे फायदेशीर आहे. ज्यांना टक्कल पडण्याचा त्रास आहे त्यांनी हे तेल जरूर लावावे. आपल्या केसच्या त्वचेसाठी हे खूपच फायदेशीर आहे असे अनेक संशोधनातून समोर आले आहे. हा उपाय जरूर करून बघा.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *