एका रात्रीत माझ्या गुडघ्याची वेदना ठीक झाली, तुम्ही पण हा चकित करणारा उपाय नक्की करून बघा…

तुमचा कितीही जुना संधिवात असुदे, सांधेदुखी, कंबरदुखी असुदे किंवा गुडघ्याचे दुखणे असो, हे लावल्यामुळे तुम्हाला इतका आराम मिळेल की ज्याची तुम्ही कधी कल्पनाच केली नसेल. नमस्कार मित्रांनो, संधिवात हा गुडघे व अन्य शरीराच्या सांधेदुखीचा आजार आहे. ज्याला “अर्थरायटिस” या नावाने ओळखले जाते. मित्रांनो, ज्यांना हा आजार होतो, त्यांचे उठणे, बसणे, पायर्‍या चढणे खूप कठीण होऊन जाते.

कारण त्यांचे गुडघे व त्यांचे सांधे यामध्ये खूप वेदना होतात. त्यांना चालणे कठीण जाते. पण यावर जर वेळेत उपचार केले नाहीत तर मात्र शेवटी ऑपरेशन करावे लागते. पूर्वीच्या काळी गुडघ्याचे दुखणे हे मोठ्या वयाच्या व्यक्तींमध्ये बघितले जात असे. पण आताच्या या व्यस्त जिवनशैलीत ही समस्या कोणालाही होऊ शकते. ज्याचे मुख्य कारण आहे, आपले राहाणीमान, म्हणजेच आपली जीवनशैली.

सतत एका जागी बसून संगणकावर काम करणे, मोबाइल व संगणक यांचा अतिरिक्त वापर, घरचे पौष्टिक अन्न न सेवन करता, बाहेरचे तळलेले, मिरची व मसाला जास्त असलेले फास्ट फूड खाणे, त्याचबरोबर व्यस्त व धावपळीच्या जिवनशैलीमुळे शारीरिक व्यायामाचा अभाव, चालण्याचा अभाव, या सगळ्यांमुळे सांधे आखडतात व सांधेदुखी, हाडांमध्ये वेदना, कंबरदुखी ह्यासारख्या समस्या निर्माण होतात. आताच्या काळात अगदी खूपच लहान वयातच या समस्या होऊ लागल्या आहेत.

आज या माहितीद्वारे मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो इतका रामबाण आहे, की एका रात्रीत तुमची गुडघेदुखी, सांधेदुखी यामध्ये फायदा होईल, ज्याचा तुम्ही विचार केला नसेल. तुम्ही ही माहिती शेवटपर्यंत जरूर पाहा. हा उपाय तयार करणे खूपच सोपे आहे. जेव्हा तुम्ही हे बनवायला शिकून घ्याल, तेव्हा सहजपणे आपल्या स्वयंपाकघरात बनवू शकाल व त्याचा लाभ घेऊ शकाल.

त्यासाठी प्रथम तुम्हाला घ्यायची आहेत पेरूची ताजी पाने. पेरूची पाने ही गुणकारी असतात. त्याच्या पानांनी कितीतरी प्रकारचे आजार नाहीसे होतात. पेरूची पाने हा असा एक हर्बल उपाय आहे जो शरीराला कोणतेही नुकसान न करता लाभ देतात. या पानांमध्ये भरपूर प्रमाणात अॅंटी-ओकसिडेंट, अॅंटी-बॅक्टीरियल व अॅंटी-इन्फ्लामेटरी गुणधर्म असतात., जे तुम्हाला संधिवात, सांधेदुखी, कंबरदुखी, हाडांमधील वेदना, गुडघेदुखी यामध्ये आराम देण्याचे काम करतात. पेरूची पाने तुम्हाला सहज उपलब्ध होऊ शकतात.

पूर्ण भारतात हे झाड तुम्हाला कोठेही आढळून येईल. एक मूठ पेरूची कोमल व ताजी पाने तोडून तुम्ही घेऊन या. पाने कोवळी असावीत. पाने स्वछ धुवून घ्या. नंतर जर तुमच्या घरात पाटा वरवंटा असेल तर त्यावर ही पाने बारीक वाटून घ्या. जर नसेल तर मिक्सरवर किंचित पाणी घालून वाटून घ्या. नंतर एका वाटीत हा लेप काढून घ्या. तुम्हाला याला हलके गरम करायचे आहे. कढई थोडी गरम करून नंतर हे मिश्रण त्यात टाकून कोमट झाले की गॅस बंद करा. थोडे ढवळत राहा. लेप एका वाटीत काढून घ्या. लगेच कोमट असतानाच तुम्हाला ते आपल्या गुडघ्यावर लावायचे आहे.

थंड झाले तर त्याचा उपयोग होणार नाही. नंतर लेपावर कपड्याने बांधून टाका. रात्रभर हे लावून ठेवा. रात्रभर ठेवणे शक्य नसेल, तर जास्तीत जास्त वेळ ठेवून सकाळी उठल्यावर काढून टाका. थोडे दिवस हा उपाय करून बघा तुम्हाला नक्की याचा फायदा दिसून येईल. माहिती आवडली असेल, तर लाइक व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *