एका रात्रीत गुडघेदुखी कायमची बंद करणारा सवोत्तम घरगुती उपाय…

५ मिनिटात घरी हे चूर्ण बनवा. कोणत्याही प्रकारची शारीरिक कमजोरी, थकावट येणे, रक्ताची कमतरता असणे, कॅल्शियमची कमतरता असणे, हात, पाय, कंबर यांच्या सांध्यात वेदना होणे, गुठळया होणे, अर्थरिटीसची समस्या असो, आजकालच्या युवा पिढीला काम करण्याची इछा होत नाही. रात्रभर काहीतरी विडियो बघतात, वेळेवर झोपत नाहीत, सकाळी लवकर उठत नाहीत त्याचे कारण म्हणजे शरीराला खूप जास्त थकवा जाणवतो तसेच अशक्तपणा येतो.

मित्रांनो, हा घरगुती उपाय तयार करण्यासाठी तुम्हाला ५ वस्तूंची जरूर लागेल ज्या वस्तु तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरात सहजपणे मिळतील. चला, तर मग वेळ न घालवता बघूया हे औषध तुम्हाला कसे तयार करायचे आहे. हे औषध इतके परिणामकारक आहे, की एक ते दोन आठवड्यात तुम्हाला त्याचे परिणाम दिसून येतील, त्याचबरोबर तुम्ही जर योगा, प्राणायाम व व्यायाम करीत असाल, तर तुमचा आजार मूळापासून नाहीसा होईल.

मित्रांनो, पहिली वस्तु जी तुम्हाला लागणार आहे, ती आहे सुंठ. सुंठ म्हणजेच सुकलेले आले. दुसर्‍या क्रमांकावर तुम्हाला घ्यायची आहे, काळी मिरी. ती किती घ्यायची आहे ते लक्षपूर्वक बघा. साधारण २ ते ३ ग्राम घ्यायची आहे. तिसर्‍या क्रमांकावर तुम्हाला लवंगेचे ३ ते ४ तुकडे घ्यायचे आहेत. १५ ते २० ग्राम चूर्ण बनवला एवढे माप बरोबर आहे. चौथ्या क्रमांकावर तुम्हाला घ्यायची आहे, खसखस, याला पोपीसीड्स असेही म्हणतात.

किराण्याच्या दुकानात तुम्हाला हे सहज मिळू शकते. ही तुम्हाला ५ ते १० ग्राम घ्यायची आहे. साधारण २ चमचे. पुढची औषधी तुम्हाला घ्यायची आहे, ती म्हणजे जायफळ. जायफळ तुम्हाला एक पूर्ण घ्यायचे आहे. हे तुम्हाला वाण्याच्या दुकानात मिळू शकते. परत मी तुम्हाला सांगू इछितो, आपण काय काय घेतले ते., सुंठ, काळी मिरी, लवंग, खसखस, जायफळ. त्यानंतर हे पूर्ण जिन्नस तुम्हाला खलबत्यात घालून त्याची पाऊडर करायची आहे.

दगडाचा खल व बत्त्या असेल तर उत्तम. नाहीतर लोखंडाचा घेऊ शकता. पण याचे सेवन करण्याची पद्धत पण तितकीच महत्वाची आहे. तसेच दिवसात किती वेळा याचे सेवन करायचे आहे ते पण जाणून घेणे जरूरी आहे. हे शरीरात उष्णता निर्माण करते का? वात, पित्त, कफ असलेल्या लोकांनी याचे सेवन कसे केले पाहिजे. प्रथम पाऊडर वाटून घेऊया. जाडसर वाटायचे आहे.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे चूर्ण गरम असते. वात प्रकृतीच्या लोकांना ज्यांना सांधेदुखी आहे, किंवा कफ आहे, सर्दी होते, त्यांनी रोज कोमट पाण्यात हे घ्यायचे आहे. जास्त गरम पडत असेल, तर एक दिवस सोडून हे सेवन करा. पित्त प्रकृतीच्या लोकांनी आवळ्याबरोबर किंवा त्रिफळा घेऊन याचे सेवन करावे. आजकालच्या युवा पिढीसाठी यापेक्षा जास्त उत्तम औषध असूच शकत नाही. तर तुम्ही पण अजमावून बघा याचे फायदे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *