एकदाच दातातील कीड व वेदना नाहीशी करेल हा अचूक प्राकृतिक व नैसर्गिक उपाय…

नमस्कार मित्रांनो,

प्रकृतीचा खजाना अनमोल व अगणित आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पति, औषधी वनस्पतिची मुळे, आपल्या जवळपास आढळतात. परंतु, माहिती नसल्यामुळे, गुणधर्म माहीत नसल्यामुळे, आपल्याला त्या झाडांबद्दल काहीच माहिती नसते. आज मी तुमच्यासाठी अशा एका औषधी वनस्पतिची माहिती घेऊन आले आहे जी कितीतरी असाध्य अशा रोगांना ठीक करते.

या झाडाला बघून तुम्हाला समजले असेल, ही जी पाने दिसत आहेत व ही जी छोटी छोटी फळे दिसत आहेत ते आहे आघाडा म्हणजेच चिरचिटा. तुमच्याकडे कोणत्या नावाने ओळखले जाते ते मला सांगा. आपल्या भारतात सगळीकडे आढळते व यांचे अनेक औषधी गुणधर्म असतात. खास करून पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला, शेतांमध्ये आपले आपणच ही वनस्पति उगवते.

या झाडाला तुम्ही नक्की बघितले असेल. हे जरी जंगली दिसले तरी याचे खूप जास्त गुणधर्म आहेत. आयुर्वेदात लटजीरा, चीरचिटा, आप्पामारा या नावाने ओळखली जाते. कितीतरी औषधांमध्ये याची पाने, खोड, मुळे, बिया याचा उपयोग केला जातो. कितीतरी आजार ही औषधी वनस्पति दूर करते. आपल्याकडे ऋषिपंचमीचा एक सण असतो. तो आता येणारच आहे.

त्या सणाच्या दिवशी याची साले काढून त्याने दात घासले जातात. दातांमधील कीड काढून टाकतो या पानांचा रस. कितीतरी प्रकारचे जंतुसंसर्ग दूर करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. आप्पामारा या वनस्पतिमध्ये अॅंटी-सेपटीक, अॅंटी-बॅक्टीरियल गुणधर्म असतात. खाज, खरूज, नायटा यावर जर याच्या पानाचा रस लावला तर त्वचेचा कोणत्याही प्रकारचा आजार ठीक होतो.

तुम्ही इथे बघत आहात, ही त्याची पाने आहेत. कधी याच्या आपण जवळून गेलो तर याच्या बिया आपल्या कपड्यांना जिकटतात. ऋषिमुनि पण याचा प्रयोग करीत असतात. हा एवढा फायदेशीर आहे. याची पाने, मुळे, साल, बिया सगळेच उपयोगी आहे.

गावामध्ये जर साप, विंचू चावला, तर याची पाने वाटून त्याची पेस्ट बनवून ती त्या जागी लावतात, प्रार्थमिक उपचार म्हणून म्हणजे त्याचे विष शरीरात पसरत नाही. मग डॉक्टरी उपाय केले जातात. ज्यांना मूळव्याधीचा त्रास आहे, त्रास आहे त्यांनी याची पाने वाटून त्या जागी रस लावला तर आराम पडतो. याच्या पानांचा, बियांचा काढा बनवून प्यायला दिला तर लिव्हरची कोणतीही समस्या दूर होते.

वजन कमी करण्यासाठी ह्याची पाने व बिया पाण्यात उकळून ते पाणी सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. आपल्याला आपल्या जवळपास असलेल्या झाडांची माहिती जरूर जाणून घेतली पाहिजे कारण त्याचे आपल्या जीवनात खूप महत्व आहे.

पायरीयाचा त्रास असेल, हिरड्यांना सूज असेल, दातातून रक्त येत असेल, तोंडाला दुर्गंध येत असेल तर याच्या पानांचा रस किंवा पाने चावून खा, दातातील कीड निघून जाईल. अमृत आहे ही वनस्पति खूपच औषधी आहे. हिंदूच्या सणाला याचा उपयोग करतात. डोकेदुखी, मलेरिया या सर्वांवर उपयोगी आहे. माझी माहिती आवडली असेल तर जरूर लाइक व शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *