एकदाच दातांमधील कीड आणि वेदना नष्ट करण्याचा अचूक देशी उपाय, एकदा करून बघा…

नमस्कार मित्रांनो.

आजच्या माहितीमध्ये आपण बोलणार आहोत एका अशा गवताबद्दल जे अगदी सर्वसाधारण असते व जे आपल्या जवळपासच्या झाडीमध्ये किंवा रस्त्याच्या कडेला मिळते. कदाचित ह्याला तुम्ही नावाने ओळखत नसाल. अपामार्ग ही वनौषधी माहीत नसल्यामुळे सर्वसाधारण लोक याला निरोपयोगी समजतात. पण असा विचार करणे योग्य नाही. अपामार्ग एक वनौषधी आहे. पावसाळ्याच्या ऋतुत ही अंकुरित होऊ लागते. थंडीच्या ऋतुत त्याला फळे फुले येतात. याच्या बिया तांदुळाप्रमाणे असतात.

अपामार्गच्या २ जाती आहेत. एक सफेद असते व दुसरी लाल असते. पण दोघांच्या गुणधर्मात जास्त फरक नाही. तुम्ही यातील कशाचाही उपयोग करू शकता. याच्या मदतीने तुम्ही दातांमधील
वेदना नाहीशा करू शकता. म्हणजेच दात हलणे, हिरड्यांमधील कमकुवतपणा, तोंडातून दुर्गंध येणे, मूतखडा, सांधेदुखी, विंचवाचा दंश याबरोबर इतर अनेक समस्या समाप्त करू शकते ही वनस्पति. त्वचारोगावर पण फायदेशीर आहे. चला तर मग विस्ताराने जाणून घेऊया अपामार्ग या वनस्पतिबद्दल.

याला बर्यारच ठिकाणी चिरचिटा असे म्हणतात., लटजीरा म्हणतात, चिरचिरा म्हणतात. तुमच्या येथे याला कोणत्या नावाने ओळखतात ते आम्हाला जरूर कमेन्ट बॉक्स मध्ये लिहून कळवा. सगळ्यात पहिले आपण बोलूया एका आजाराबद्दल ज्यामध्ये माणसाला खूप भूक लागते. नेहमी तुम्ही ऐकत असाल भूक कमी लागण्याचे औषध. पण एक असा आजार आहे ज्यामध्ये माणसाला खूप जास्त भूक लागते. या आजाराला “भस्मारोग” असे म्हणतात. यामध्ये व्यक्तीची खाण्यापिण्याची इछा खूपच जास्त होऊ लागते. या वनस्पतीच्या ३ ग्राम बियांचे चूर्ण बनवा व दिवसातून दोनदा एक आठवडा हे
चूर्ण घेतल्यामुळे भस्मारोगापासून तुम्हाला आराम मिळतो.

तुमची भूक कमी होत जाईल. त्यानंतर तुम्हाला कुठे जखम झाली तर याच्या मुळांचा काढा बनवून ती जखम किंवा घाव धुतला तर घाव ठीक होतो. त्वचारोग झाला असेल, खाज, खरूज, नायटा असेल तर याची पाने वाटून फोड, जखम, नायटा यावर लावल्यामुळे आराम पडतो. आजार नष्ट होतो. तोंडात जर छाले झाले असतील, तर याच्या पानांचा काढा बनवून गुळण्या केल्यामुळे तोंडातील छाले ठीक होतात. जर कुठे विषारी किडा चावला असेल, तर काय केले पाहिजे. विंचू चावला असेल, तर याच्या पानांचा रस काढून तो त्या जागी लावल्यामुळे विष उतरून जाते व आराम पडतो.

चला तर मग जाणून घेऊया सांधेदुखी असेल, संधिवात असेल, तर काय केले पाहिजे. अपामार्गची १० ते १२ पाने वाटून घ्या. ती पेस्ट गरम करा. नंतर ती जिथे वेदना आहेत तिथे लेप लावा व कपड्यांने बांधून ठेवा. तेव्हा सांधेदुखीमध्ये आराम मिळतो. मूतखडयाची समस्या असेल तर काय केले पाहिजे. अपामार्गची ५ ते ६ ताजी मुळे पाण्यांत वाटून घ्या. ते पाणी सेवन केल्यामुळे मूतखड्याच्या आजारात लाभ होतो. हे मूत्रपिंडातील खडे बारीक करून लघवीच्या वाटे शरीरातून बाहेर टाकते.

आता बघूया दातांचे विकार. दातांचे हलणे, हिरड्याचा कमकुवतपणा यासाठी याची मुळे व साल याने दात घासल्यामुळे दात मजबूत होतात व दातांची समस्या होत नाही. दातांचे आजार होतात त्यासाठी २ ते ३ पानांच्या रसात कापूस बुडवून जिथे वेदना आहे तिथे तो लावा. दातांच्या वेदनांपासून आराम मिळेल. मित्रांनो, आजच्या या
मााहितीमध्ये आम्ही तुम्हाला अपामार्ग या वनस्पतीचे अनेक फायदे सांगितले. तुम्हाला आमची माहिती आवडली असेल तर जरूर लाइक व शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *