उरलेले पीठ कधीही ठेवू नका नाहीतर भोगावे लागतील हे परिणाम…

आजकालच्या या यंत्र युगात आपल्या जीवनात यंत्र किंवा उपकरणे यांचा वापर इतका जास्त झाला आहे, की आपली कामे जास्त करून ही यंत्रेच सोपी करतात. जसे की, कणीक भिजवणे, भाज्या ताज्या ठेवणे, वाटण करून ठेवणे. आपली कामे ही यंत्रेच करतात. हल्लीच्या दिवसात सर्वांच्या घरात फ्रीज तर जरूर असतो आणि आपण याचा वापर खाण्याच्या वस्तु टिकवून ठेवण्यासाठी करतो. कारण त्यामुळे त्या वस्तु ताज्या राहू शकतील आणि जंतुमुक्त राहू शकतील, असे आपण मानतो. पण हेच फक्त सत्य नाही, त्याचे दुष्परिणाम पण आहेत.

आजकाल सर्वांचेच जीवन खूप धावपळीचे झाले आहे, पूर्वीच्या काळी स्त्रिया घर सांभाळत असत तर पुरुष बाहेरील कामे सांभाळत असत.. ‘परंतु आता तसे काहीही राहिलेले नाही’, जस जसे जीवनमान बदलले तश्या गरज देखील बदलल्या.. आणि आता स्त्रिया देखील पुरुषांच्या बरोबर घराबाहेर पडून चार पैसे देखील कमवतात, आजकाल स्त्री आणि पुरुष दोघांनी मिळून काम केले तरच घराचा खर्च अगदी व्यवस्थित चालतो.

म्हणूनच स्त्रियांना ८ ते १० तास घराबाहेर राहावे लागते, त्यामुळे स्त्रियांना घरामध्ये पूर्ण वेळ काम करणे शक्य नसते. मग घरी येऊन स्त्रियांची कामे आवरण्याची घाई असते, त्यामुळे काही स्त्रिया सकाळी लवकर ऑफिसला जायचे असल्याने, “रात्रीच सकाळी बनवायच्या स्वयंपाकाची तयारी त्या करून ठेवतात.” त्यात भाजी निवडणे.. चिरणे, मसाला वाटण करणे, इत्यादी सर्व तयारी त्या करून ठेवतात.

इथ पर्यंत तयारी करून ठेवणे ठीक आहे, परंतु काही स्त्रिया सकाळी चपात्या लवकर करण्यासाठी कणीकही रात्रीच मळून फ्रीज मध्ये ठेवतात.. आणि सकाळी उठल्यानंतर त्याच पिठाच्या पोळ्या बनवतात, हे “आरोग्याच्या दृष्टीने” चुकीचे तर आहेच पण “शास्त्रीयदृष्ट्याही” अयोग्य आहे. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यू झाला तर त्याच्या बरोबर पिठाच्या गोळ्याचे तुकडे दिले जातात ते म्हणजे पिंड..

पिठाचा गोल गोल गोळा करून पिंड तयार केली जाते, म्हणजेच जो गोल गोळा असतो तो पिंड समान असतो आणि आपण पिठाची कणीक मळून ती गोल गोल बनवून डब्यात प्याक करतो आणि फ्रीज मध्ये ठेवतो. या कणकेच्या गोळ्यावर प्रेताचा हक्क होतो तो पिंड समान बनतो, आणि आपण दुसऱ्या दिवशी तोच गोळा फ्रीज मधून बाहेर काढून त्याच्या पोळ्या करतो व खातो, अशा कणकेचा गोळा खाल्याने आपल्या घरात वाद-विवाद उत्पन्न होतात, किंवा डोकेदुखी, कंबरदुखी, आणि गुडगेदुखी असे विकार होतात.

कारण या पिठाच्या गोळ्यावर आपला अधिकार नसून प्रेताचा अधिकार असतो, तो गोळा त्यांच्या हास्याचा बनतो आणि आपण जर त्यांच्या वाट्याचे अन्न खाल्ले तर ते आपल्याला त्रास देतात. म्हणून कधीही चुकूनही रात्री भिजवून ठेवलेले कणकेच्या गोळ्याच्या पोळ्या करू नये.. चुकून सकाळी जर पीठ भिजवले तर त्याच्या पोळ्या आपण संध्याकाळी करू शकतो पण रात्री कणिक मळून त्या पिठाचा दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर कधीही वापर करू नये.

हे शास्त्रीयदृष्ट्या तर चुकीचे आहेच त्या शिवाय रात्रभर भिजवलेल्या पिठाचा गोळा तसाच ठेवल्यास त्यात bacteria म्हणजे जीवजंतूची वाढ होते आणि दुसऱ्या दिवशी त्याच पिठाच्या पोळ्या करून आपण खाल्ल्या तर त्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो, त्यामुळे पोटाचे विकार होतात, पोटाच्या समस्या निर्माण होतात, पचनक्रियेशी संबंधित अडीअडचणी वाढतात.

डोके दुखणे, चक्कर येणे, गरगरने, मळमळणे, अशा अनेक समस्या उद्भवतात म्हणून सकाळी दहा मिनिटे लवकर उठावे, परंतु रात्री पोळ्यांसाठी कणिक मळून ठेवू नये.. जेवढे लागेल तेवढेच पीठ त्यावेळी मळावे आणि लगेचच त्याच्या पोळ्या कराव्या, कारण ताजे ताजे बनवलेले अन्न शरीरासाठी पोषक असते. त्याशिवाय त्यात जीवजंतू व bacteria चा देखील धोका नसतो, तसेच धर्म शास्त्रीयदृष्ट्या देखील हे योग्य आहे. मित्रांनो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल म्हणून या पोस्टला लाईक आणि शेअर नक्की करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *