उपाशीपोटी तुळशीची पाने खा चकित व्हाल, तुळस फायदे…

नमस्कार…

मित्रांनो आपण जर दररोज तुळशीची पाने खाली तर आरोग्यदृष्ट्या आपल्याला कोण कोणते फायदे होतात…?. मित्रांनो तस पाहायला गेलो तर प्रत्येक हिंदुधर्मीयांच्या घरासमोर तुळस ही असतेच. पण मित्रांनो तुळशी पासून आपणाला कोण कोणते फायदे आहेत हे बऱ्याच व्यक्तींना माहीत नाही आहे.

आयुर्वेदामध्ये ह्या तुळशीच्या रोपाचे महत्त्व सांगितले आहे. आयुर्वेद अस सांगतो की अनेक रोग, असंख्य रोग तुळशीचं रोपटं बरं करू शकते. मित्रांनो यासाठी आपणाला तुळशीची जी पाने आहेत त्याचे रोज सेवन करावे लागणार आहे. आपल्याला ही पाने किती खायची, कोणत्या वेळी खायची आणि याचे कोण कोणते फायदे होतात हे आज आपण पाहणार आहोत.

मित्रांनो तुळशीच्या रोपाच महत्व किंवा तुळशीचं महत्त्व आपल्या धर्मात खूप आहे मात्र आरोग्यादृष्ट्या सुद्धा व मेडिकल सायन्स ने सुद्धा हे मान्य केलेले आहे. मित्रांनो सकाळी उठल्या बरोबर तुळशीची दोन ते तीन पाने चावून चावून खा, मग ती तुम्ही पाणी पिऊन खावा किंवा पाणी न पिता खा तर याचे प्रचंड फायदे असंख्य फायदे, तुम्हाला पाहायला मिळतात आणि आपण ह्या ठिकाणी महत्वाच्या तीन फायद्याबद्दल बोलणार आहोत.

मित्रांनो पहिली गोष्ट आपले “हृदय “. जर हृदय स्वास्थ राहायचे असते तर तुळशीची दोन तीन पाने रोज चावून चावून खात जा, मित्रांनो याचा कारण अस आहे की तरुण मुलांना सुद्धा हार्ट अटॅक येऊ लागलेले आहे. तर मित्रांनो या हार्ट अटॅक पासून बचाव करण्याचं काम ही तुळशीची पाने नक्की करतील.

हे पहा मित्रांनो आपल्या शरीरात दोन प्रकारचे कोलेस्टेरॉल असतात एक चांगले कोलेस्टेरॉल आणि दुसरे बॅड. तर मित्रांनो जर तुम्ही रोज सकाळी दोन ते तीन तुळशीची पाने खाल्ली तर मित्रांनो जेव्हा तुम्ही तुळशीची पाने चावून चावून खाता तेव्हा तुमच्या शरीरातील जे बॅड कोलेस्टेरॉल आहे, ही तुळशीची पाने बॅड कोलेस्टेरॉलला नष्ट करतात. तर मित्रांनो या तुळशीच्या पानांचा जो रस आहे ते बॅड कोलेस्टेरॉल नष्ट करतो. परिणामी हार्ट अटॅक येण्यापासून बचाव होतो.

मित्रांनो दुसरा मोठा फायदा “डायबिटीज (मधुमेह) आज काळ आपण पाहतो की प्रत्येक घरात डायबिटीज चा पेशेंट आहेच आहे. आणि ह्या डायबिटीज पासून बचाव करायचा असेल तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या “रोग होण्यापूर्वीच रोग होऊ नये याची काळजी घेतलेली कधीही चांगली” म्हणून मित्रांनो तुम्हाला अस वाटत असेल की तुम्ही आणि तुमच्या कुटूंबीयांचा डायबिटीज पासून बचाव व्हावा, तर मित्रांनो रोज सकाळी दोन ते तीन पाने तुळशीची घ्या ती चांगली धुवून काढा आणि ती चावून चावून खा.

तर मित्रांनो अस केल्याने तुळशीची पाने खाल्याने आपल्या शरीरातील जे काही इन्सुलिनचा जो स्राव होत असतो तो स्राव वाढतो आणि हा इन्सुलिनचा चा स्राव वाढल्यामुळे आपोआपच डायबिटीज पासून बचाव होतो. हा अत्यंत मोठा दुसरा फायदा आहे. ज्यांना डायबिटीज झालेला आहे अश्या व्यक्ती सुद्धा ही पाने खाऊ शकता. आणि मित्रांनो तिसरा खूप मोठा फायदा, व्हायरल इन्फेक्शन पासून बचाव.

आज काळ आपण पहातो वातावरण सातत्याने बदलत राहते. कधीही पाऊस पडतोय कधीही ऊन पडतंय कधी उन्हाळा आहे कधी हिवाळा हे समजत नाही, आणि परिणामी काय होत आपल्या घरातील जी लहान मुले आहेत त्यांच्यावर याचा मोठ्या प्रमाणात इफेक्ट होतो. लहान मुले खूप लवकर आजारी पडतात, सर्दी होणे , पडसे होणे , नाकाला धार लागणे ताप येने अश्या गोष्टी वारंवार होतात. खोकला पुन्हा पुन्हा येतो.

मित्रांनो अगदी लहान मुलांच्या पासून ते म्हाताऱ्या व्यक्तींना जर ही पाने रोज चावून चावून खाली तर आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मोठ्या प्रमाणात वाढते, आणि अश्या व्हायरल इन्फेक्शन पासून आपला बचाव होतो. तर मित्रानो हे तीन मोठे फायदे आपल्याला मिळणार आहेत. मित्रांनो एक गोष्ट मात्र जाणीवपूर्वक सांगू इच्छितो की या पानांच ज्यास्त सेवन करू नका.

मी सांगितले दोन ते तीन पाने फक्त खा. लहान मुलांना एक ते दोन पाने पुरेशी आहेत जेष्ठ व्यक्तींना दोन ते तीन पाने पुरेशी आहेत. या पेक्षा ज्यास्त पाने तुम्ही खाऊ नका कारण तुम्हाला दातांचे विविध आजार तुम्हाला जाणवतील कारण या तुळशीच्या पानामध्ये पारा आढळतो आणि हा पारा आपल्या दातांसाठी धोकादायक ठरू शकतो..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *