आयुष्यभर कोणतीच गोळी लागणार नाही, पित्त आणि शरीरातील उष्णता, पोट चुटकीत साफ…

आठवड्यात फक्त एक दिवस हा उपाय करा, तुमच्या शरीरात कितीही पित्त असुद्या किंवा उष्णता असुद्या पुर्णपणे निघून जाईल. सध्याच्या काळात शरीर मजबूत असण्याची अत्यंत गरज आहे. कुठल्याही संक्रमनाशी लढायचे असेल तर प्रतिकारशक्ती मजबूत असणं तितकंच महत्त्वाचे आहे.

त्यातही एखाद्या व्यक्तीचे पित्त वाढले असेल आणि या वाढलेल्या पित्तामुळे त्रास होत असेल, मळमळ होत असेल किंवा अपचन होत असेल आणि ढेकर येणे, गॅसेस होणे या समस्या होत असतील. रक्त अशुद्ध झाल्याने वारंवार त्वचारोग किंवा त्वचेच्या निगडित समस्या आहेत त्या समस्या होत असतील तर हा उपाय अत्यंत खास असून हा उपाय आठवड्यात एक दिवस करायचा आहे.

हा उपाय सोपा असून घरच्या घरी करता येण्यासारखा आहे. यामुळे शरीरातील उष्णता पुर्णपणे कमी होते, शरीर मजबूत बनते. सर्दी, खोकला, कफ यावरती नियंत्रण मिळते. यासाठी पहिला घटक लागणार आहे कडुलिंबाची पाने. कडुलिंबाचे झाड हे प्रत्येकाच्या घराशेजारी किंवा इकडे तिकडे बऱ्याच ठिकाणी असते. खेडेगावात तर नक्कीच असते. कडुलिंबाच्या झाडाला आयुर्वेदात फार महत्व आहे. याचे मुळ, पान, फुल, फळ, साल सर्व गोष्टी अनेक रोगांवर उपयोगी आहेत असं आयुर्वेदात सांगण्यात आलं आहे.

या कडुलिंबाच्या पानामध्ये निंबिन, निंबेनीन, निंबेडीन हे कडू घटक असतात. हे कडू असले तरी शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असतात. निसर्गात मिळणाऱ्या जेवढ्या कडू वनस्पती, कडू गोष्टी आहेत त्या आपल्या शरीरासाठी नक्कीच उपयोगी असतात आणि त्या कुठल्या ना कुठल्या रोगावर उपचार म्हणून वापरण्यात येतात. आपल्याला या उपायासाठी साधारणतः तीन ते चार कडुलिंबाची पाने लागणार आहेत.

ही पाने स्वच्छ धुवून घ्या आणि ती वाटून घ्या. शरीर निरोगी राहण्यासाठी अजून एक उपाय घरच्या घरी करू शकतो ते म्हणजे साधारण पाव चमचा हळद संध्याकाळी एक ग्लास कोमट पाण्यामध्ये टाकून जर झोपण्यापूर्वी घेतली तर आपले शरीर वज्राप्रमाणे मजबूत होते आणि आपल्याला कुठलाही रोग स्पर्श करत नाही. मात्र हा उपाय आपल्याला सहा महिने ते एक वर्ष सलग करावा लागतो. तो छोट्या मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत चालतो.

आता आपण वाटलेल्या पानांमध्ये दुसरा पदार्थ मिक्स करायचा आहे गुळ. या उपायासाठी सेंद्रिय गुळ मिळाला तर ठीक अन्यथा आपल्या घरी जो गुळ असेल तो तुम्ही वापरू शकता. साधारण या पानांमध्ये बसेल एवढ्या आकाराचा गुळ घेऊन या मिश्रणाची गोळी करायची आहे किंवा हे मिश्रण एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. ज्यांना कडुलिंबाची पाने मिळणार नाहीत त्यांनी आयुर्वेदिक स्टोअर मधून कडुलिंबाच्या पानाच्या गोळ्या मिळतात, म्हणजे त्या पावडर पासून बनवलेल्या असतात त्या वापरू शकतात.

ह्या गोळ्या जर एखाद्या व्यक्तीला खुप त्रास असेल तर सलग अकरा दिवस रोज सकाळी उपाशीपोटी घेऊन त्यावर एक कप गाईचे दूध घ्यायचे आहे. ज्यांना आपलं शरीर मजबूत ठेवायचं आहे त्यांनी आठवड्यात एक वेळा हे मिश्रण किंवा गोळी बनवून घ्यायची आहे व त्यावरती एक कप गाईचे दूध घ्यायचं आहे. याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही. फक्त ज्या व्यक्तींना शुगर असेल किंवा डायबेटिसचा त्रास आहे अशा व्यक्तींनी गुळ वापरू नये.

त्यांनी फक्त पावडर घ्यावी आणि त्यावर दूध घ्यावे. या उपायाने शरीर वज्रासारखे मजबूत होते आणि आपल्याला कुठलाही रोग होत नाही. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *