आयुर्वेदातील सर्वात ताकतीच्या बिया, शरीरातील विषारी घटक बाहेर करून संपूर्ण शरीराचे शुद्धीकरण…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो फोटोत दाखवल्या प्रमाणे ज्या बिया तुम्ही पाहत आहेत त्या आयुर्वेदामधल्या जगातील सर्वात ताकदवान बिया आहेत. कारण या बियांमुळे तुमची किडनी पूर्ण स्वच्छ होते. तुमचे लिव्हर पूर्णपणे स्वच्छ होत. पचनसंस्था आणि रक्तामधील जे विषारी घटक असतात ते पूर्णपणे बाहेर काढण्याच काम या बिया करतात.

त्याचबरोबर शरीरामध्ये जर मेध असेल, वात असेल, कॅप असेल, तर हे जे दोष आहेत ते पूर्णपणे नष्ट करणाऱ्या या बिया आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चिकणगुणया, मलेरिया, डेंग्यू, हा आजार झालेल्या ज्या व्यक्ती आहेत, या व्यक्तींनी तर या बियांचा अवश्य वापर करायचा आहे.

कारण या बियांमुळे या आजारानंतर जे जाणवणारे साईड इफेक्ट आहेत त्यामध्ये हातापायांना सूज येणं, साधे दुखणं, किंव्हा चक्कर येणे, आळस येणं, एकदम थकल्यासारखं वाटण, हे जे साईड इफेक्ट्स आहेत ते पूर्णपणे या बियाणे निघून जातात. त्याचबरोबर मुतखड्याचा जो त्रास आहे तो निघून जातो.

त्यामुळे प्रत्येकाने नाष्ट्यामध्ये याचा वापर केला तर अत्यंत उपयुक्त आहे शरीरासाठी. तर या ज्या बिया आहेत त्या सर्वत्र उपलब्ध असणाऱ्या, सर्वत्र मिळणाऱ्या बिया आहेत. याला कुळीद किंव्हा हुलगा असे म्हणतात. हे एक आयुर्वेदिक कडधान्य आहे. खेड्यांमध्ये अनेक आजारांसाठी याचा वापर केला जातो. फक्त शहरांमध्ये दुर्लक्षित असणार हे कडधान्य आहे. याचा जर वापर केला तर चरबी सुद्धा पूर्णपणे निघून जाते. वजन पूर्णपणे आटोक्यात येत.

कारण या कडधान्यामध्ये सर्वात कमी चरबी आणि सर्वात जास्त चोथा असतो. त्याचबरोबर पचायला सुद्धा हे सर्वात हलक कडधान्य आहे. त्यामुळे याचा शरीराला जबरदस्त फायदा होतो. याचा वापर कसा करायचा आहे ते आपण पाहूया. मित्रांनो हे जे कडधान्य घरी आणायचं आहे आणि स्वच्छ धुऊन घ्यायचं आहे. स्वच्छ धुऊन घेतल्यानंतर रात्री त्याला भिजत घालायचे आहे. भिजत घालतांना थोडस जास्त पाणी आपल्याला वापरायचे आहे.

साधारणपणे 50 ते 100 ग्राम आपल्याला हे भिजत घालायचे आहे. सकाळी उठल्याबरोबर आपल्याला हे जे भिजत ठेवलेलं पाणी आहे याच पाण्यामध्ये आपल्याला ते उकळून घ्यायचं आहे. साधारणपणे जे धान्य आहे ते शिजेपर्यंत आपल्याला ते उकळवून घ्यायचे आहे. त्यानंतर जे पाणी आहे ते आपल्याला गाळून घ्यायचे आहे आणि या काढ्याचा आपल्याला वापर करायचा आहे. शिजवलेले जे धान्य आहे ते सुद्धा आपल्याला वापरायचे आहे.

हा जो आयुर्वेदिक काढा तयार झाला आहे तो आपल्याला सकाळी उपाशीपोटी घ्यायचा आहे. या कुळीदाच्या पाण्यामध्ये इतक्या जबरदस्त प्रमाणात आयुर्वेदिक घटक आहेत. मग यात प्रथिन आहेत, कॅल्शिअम आहे, फॉस्फरस आहे, लोह आहे, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या मध्ये आज आयुर्वेदिक घटक आहे ज्या मुळे तुमच्या किडनीचे स्वच्छता होते. किडनी मधील विषारी पदार्थ बाहेर काढले जातात. सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांना किडनी स्टोन आहे ते स्टोन पूर्णपणे विरघळून टाकण्याचे काम या कडधान्याच्या पाण्यामध्ये आहे.

लिव्हर साठी सुद्धा खूप महत्त्वाचा आहे हा काढा. लिव्हर स्वच्छ, लिव्हर मधील विषारी पदार्थ बाहेर काढतो हा काढा. तुम्हाला जर चिकणगुणया, मलेरिया, किंव्हा डेंग्यू चा आजार झालेला असेल तर आवश्य या काढ्याचा दोन ते तीन दिवस वापर करा. तुमच्या शरीरामध्ये आलेली मरगळ, थकवा, साठलेले विषारी घटक, पूर्णपणे बाहेर निघून जातील आणि तुम्हाला एकदम चांगले वाटायला लागेल.

ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्या साठी सुद्धा हे अत्यंत महत्त्वाचे आहे. वजन कमी करण्यासाठी सांगितल्या प्रमाणे रोज कडधान्य भिजत घालायचे आहे, त्याचे पाणी गाळून जी उसळ राहिली आहे नाष्टा म्हणून खायची आहे. पचायला सुद्धा हे एकदम हलक कडधान्य आहे. त्यामुळे तुमच्या शरीराभोवती साठलेली जी अतिरिक्त चरबी आहे ती वितळते आणि त्यामुळे तुमचं वजन या मुळे कमी होत. हा उपाय सर्व जण करू शकतात. तर मित्रांनो उपाय एकदा नक्की करून पहा. माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *