असा कोणताच आजार नाही जो यापुढे टिकाव धरू शकेल, कोठे ही वनस्पती बघितली तर सोडून न देता त्याचा उपयोग करा.

नमस्कार मित्रांनो. कसे आहात तुम्ही सगळे लोक. मी देवाकडे प्रार्थना करतो की तुम्ही जिथे कुठे असाल तिथे स्वस्थ व खुश राहा. मित्रांनो, आपला देश भारत हा अनेकविध वनौषधिनी भरलेला आहे. आपल्या देशात अनेक प्रकारच्या चमत्कारी व दुर्लभ अशी वनौषधी आढळते., जी दुसर्‍या कोणत्याही देशात आढळत नाही. या सगळ्या वनस्पति आपल्या आसपास असतात पण आपल्याला त्याची माहिती नसते, त्यामुळे आपण या सगळ्या वनस्पतींना पालापाचोळा किंवा निरोपयोगी समजतो. परंतु, मित्रांनो आम्ही आमच्या पेजच्या माध्यमाच्यातर्फे तुमच्यापर्यन्त या वनस्पतीबद्दल माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न करतो.

तर ह्या माहितीचा क्रम पुढे नेत आम्ही आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत पर्णबीज या वनस्पतीबद्दल ज्याला हिन्दीमध्ये “पत्थरचट्टा” असे म्हणतात., म्हणजेच पानफुटी. पानफूटी ही वनस्पति पूर्ण भारतात आढळते. पानफुटीची झाडे लोक आपल्या घरात कुंडीत लावतात. पानफुटी सरळ, ताणलेला लांब व १२ महीने उगवणारी वनस्पति आहे. याची ऊंची ३ ते ४ फुटपर्यन्त असते. याची पाने विविध प्रकारच्या औषधांसाठी उपयोगात आणली जातात. या झाडाचे खोड आतून पोकळ असते.

याचा रंग पूर्ण हिरवा किंवा लाल असतो. पानफुटीची फुले जास्त करून थंडी व वसंत ऋतुत येतात. या वनस्पतीची खास गोष्ट ही आहे की जर ओल्या मातीत जर याची पाने लावली, तर नवीन झाडे उगवितात. म्हणूनच त्याला “पानफूटी” म्हणजेच पानातून नवीन फुटणारी किंवा उगवणारी वनस्पति असे नाव पडले असावे. पानफुटीचे खूप जास्त असे आयुर्वेदिक फायदे आहेत. तुम्ही या वनस्पतीच्या मदतीने डोकेदुखी ठीक करू शकता. जर तुम्हाला मूतखडयाची समस्या असेल, तर पानफूटी मूत्रपिंडातील मुत्राचे खडे विरघळवून टाकते व ते शरीरातून बाहेर टाकते.

जर हातापायांना सूज असेल, तर पानफूटी सूज दूर करू शकते. मोठी जखम झाली आहे म्हणजेच घाव झाला आहे व तो लवकर भरून येत नसेल, तर तो घाव बरा करू शकते पानफूटी. एकेका फायद्याबद्दल आपण जाणून घेऊया. माहिती आवडत असेल तर लाइक व शेअर करायला विसरू नका.

सगळ्यात प्रथम सांगतो की शरीरात कुठेही जखम किंवा मोठा घाव झाला असेल, तर त्याला कसे ठीक करू शकतो. त्यासाठी तुम्ही पानफूटीची पाने खलबत्यात किंवा पाटा वरवंटा याच्या मदतीने वाटून घ्या व मंद आचेवर ती गॅसवर गरम करून घ्या. जिथे जखम झाली आहे त्यावर थोडा वेळ ही पेस्ट किंवा लेप लावून ठेवा. हे नियमित केल्यामुळे घाव किंवा जखम हळू हळू भरून येईल व ठीक होईल.

त्याचबरोबर जर तुम्ही सुजेच्या समस्येने हैराण असाल, तर पानफूटीची पाने गरम करून सूज जिथे आली आहे मग ती हातावर असो किंवा पायावर, त्या भागावर बांधा त्यामुळे सूज उतरून जाईल. त्याचबरोबर लघवीसंबंधी काही आजार असेल, म्हणजेच लघवी वारंवार होत असेल, त्यासाठी पुरुषांनी या पानफूटीच्या पानांच्या रसात काही ग्रॅम मध मिसळून त्याचे सेवन केले पाहिजे. त्यामुळे मूत्रविकार लवकर ठीक होतात. त्यासाठी याची पाने वाटून त्याचा रस काढून तो गाळून त्यामध्ये मध मिसळून त्याचे सेवन करा.

काही दिवस हे घेतल्यामुळे मूत्रविकार ठीक होतो. त्याचबरोबर डोकेदुखी असेल, वारंवार डोके दुखत असेल, तर पानफूटीची पाने वाटून त्याचा लेप कपाळावर लावल्यामुळे डोकेदुखी थांबते. त्याचबरोबर मूतखडयाची समस्या असेल, तर पानफूटीचा काढा बनवून सेवन केल्यामुळे फायदा होतो. पण याचे सेवन कोणत्याही जाणकार वैदयाच्या सल्ल्याने केले पाहिजे. आमची माहिती कशी वाटली ते कमेन्टमध्ये जरूर सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *