अर्ध्या कांद्याचा असा करा वापर, वारंवार पाद येणे चुटकीत बंद होईल, मुतखडा पडून जाईल, आयुष्यात रक्ताची कमी होणार नाही…

मित्रांनो अगदी प्रत्येकाच्या घरात दररोज च्या भाजीमध्ये कांद्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. जेवताना कच्चा कांदा खायला अनेक जणांना आवडते .पण याच कांद्याचा ठराविक अनुमानसोबत आणि एक विशिष्ट प्रमाणात वापर केला तर कांदा हा अनेक आजारावर आयुर्वेदिक औषध देखील आहे . कांद्याचे असेच काही आज आपण औषधी उपयोग जाणून घेणार आहोत.

मित्रांनो तुमचे केस पांढरे होत असतील आणि तुमचे केस दीर्घ काळ काळे राहवे असे तुम्हाला वाटत असेल, तर किमान आठवड्यातून किमान तीन वेळा अंघोळी पूर्वी अर्धा तास आधी एका कांद्याचा रस काडून केसांना मुळापर्यंत लावा आणि नंतर केस धुवा या साध्या उपायाने तुमचे केस पांढरे होणे थांबेल. आणि मुलायम आणि लांब सडक होतील.

कुत्रा चावल्याच्या जखमेवर कांदा एंटीसेप्टिक म्हणून काम करतो. एक कांदा बारीक ठेचून त्यांमध्ये मध मिसळून त्याचा जखमेवर लेप केल्याने जखम निर्जंतुक होऊन जखम लवकर भरली जाते.
भयंकर कान दुखीचा त्रास थांबवण्यासाठी तुमच्या घरात असणाऱ्या कांद्याचा रसकाढून त्यामध्ये खोबरेल तेल मिसळून याचे दोन तीन थेंब दुखणाऱ्या कानामध्ये टाकले तर कान दुखणे थांबते.

उष्णता वाढल्यामुळे बऱ्याच वेळेला उष्माघात होतो. अश्या वेळी कांद्याचा रस कपाळावर, तळहातांना आणि तळपायांना लावून या पन्नास मिली रसामध्ये दोन चमचे मध मिसळून पिल्याने उष्माघाताचा होणारा त्रास थांबतो. मित्रांनो जेवताना कच्चा कांदा खाण्याने डोळ्यांच्या समस्या दूर होऊन डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहते.

एक कांदा विस्तवावर भाजून त्याचा गर बारीक कुटून त्यामध्ये मीठ टाकून खाल्याने अपचनाने उद्भवणारी गॅसेसची समस्या नष्ट होते. अजीर्ण झाले असेल तर कांद्याच्या एका फोडीवर लिंबाचा रस सोडून खाल्याने अजीर्ण नष्ट होते . लहान मुलांना एक चमचा कांद्याच्या रसामध्ये एक चमचा मध मिसळून पाजल्याने पोटातील कृमींचा नाश होतो.

ऍसिडिटीचा त्रास होत असेल तर पांढरा कांदा कापून त्यामध्ये दही मिसळून खाल्याने अपचनाचा त्रास थांबतो . जुलाब किंवा उलट्यांचा त्रास होत असेल ,तर कांद्याचा दोन तीन थेंब रस अर्ध्या तासाच्या अंतराने नाभीवर लावल्याने आराम वाटतो . मूत्रपिंडातील मुतखडे बाहेर काढण्यासाठी कांद्याच्या रसामध्ये पिठीसाखर मिसळून ते उन्हामध्ये ठेवावे आणि दररोज ह्यातील एक एक चमचा खाल्याने मुतखडे बाहेर पडतात.

एखाद्या छोट्या डबी मध्ये कांद्याचा रस आणि कापूस भरून ठेवावा आणि त्याचा गंध नाकावाटे घेत राहिल्याने दम्याचा (Asthma ) त्रास कमी होतो. दोन चमचे कांद्याच्या रसामध्ये एक चमचा मध मिसळून पिल्याने दमा, सर्दी किंवा कप कमी होतो. डोकेदुखी थांबवण्यासाठी कांद्याचा रस माथ्यावर लावावा, कच्चा कांदा दररोज खाल्याने शरीरात रक्ताची कमतरता कधीच उद्भवत नाही.

मित्रांनो असा हा बहूउपयोगी कांदा शिजवून खाण्यापेक्षा कच्चा खाल्याने त्याचा आपल्याला उत्तम रित्या वापर करता येतो.  माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *