अपुऱ्या झोपेचे दुष्परिणाम जाणून घ्या.. झोपेची योग्य वेळ आणि आजच जाणून घ्या काही Health Tips…

नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो आजचा विषय आहे झोप. झोप ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. जर तुम्हाला पुरेशी झोप मिळत नसेल , किती वाजता झोपावं किती वाजता उठावं, किती तास झोप घ्यावी या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. आणि या गोष्टींच पालन झालं नाही तर आपल्या शरीरावर याचे अनेक विपरीत परिणाम होत असतात. हे खूप लोकांना माहीत नाही. लोक विनाकारण जागरण करतात. रात्र रात्र भर जागतात. अगदी काही तासांचीच झोप घेतात. अशा अनेक चुकीच्या सवयी आहेत. आन आपण याबधलंच माहिती घेणार आहोत.

मित्रांनो आपण लवकरात लवकर झोपले पाहिजे. आपण दररोज 10 च्या आधीच झोपायला हवं. हो मित्रांनो कारण 10 च्या पुढे जागणं आपल्या शरीराला हानिकारक आहे. तसेच आपण सकाळी 6 पूर्वी उठायला हवं आणि किमान 7 ते 8 तास इतकी झोप आपल्याला हवी आहे. मित्रांनो काही लोक दुपारी सुद्धा झोपतात. तर त्यांना फक्त अर्धा तासाची झोप पुरेशी आहे. तर हे झोपण्याचे नियम तुम्हाला पाळायला हवे.

आता पाहूया की की नियम आपण पाळले नाहीत तर आपल्या शरीरावर कोणते दुष्परिणाम होतात. पहिला मोठा परिणाम आहे आपली स्मरणशक्ती कमी होते. मित्रांनो जर आपण हे नियम पाळले नाही तर हळूहळू आपली स्मरणशक्ती कमी होऊ लागते. वाचलेले, लिहिलेले, अनुभवलेले लक्षात राहत नाही.

दुसरा परिणाम आहे वजन वाढणे. तुम्ही जर खूप काळापासून जागरण करत असाल, उशीरा झोपण्याची सवय जर तुम्हाला लागली असेल या मुळे तुमची जी चयापचन ची जी यंत्रणा आहे यावरती विपरीत परिणाम होतो. शरीरातील हॉर्मोन ची जी लेव्हल आहे ती बिघडते आणि परिणामी आपल्या भुकेवर त्याचा परिणाम होतो. वजन नियंत्रणात राहत नाही.

मित्रांनो तुम्ही जर अपुरी झोप घेत असत तर मेंदूवर देखील याचा परिणाम होती. परिणामी चिडचीड पणा वाढतो. एकाग्रता राहत नाही आणि प्रचंड प्रमाणात थकवा जाणवू लागतो. आपल्या रोगप्रतिकारक शक्ती वर सुद्धा याचा विपरीत परिणाम होत असतो. मित्रांनो सर्दी, खोखला, अंगदुखी यांसारख्या समस्या सुद्धा तुम्हाला जाणवू लागतात. म्हणून आपण हे झोपेचे वेळापत्रक नक्की पाळा. तर आहेत दुष्परिणाम.

मित्रांनो हे वेळापत्रक पाळून चालणार नाही, यांच्यासोबत काही छोटे छोटे नियम आम्ही तुम्हाला सांगणार आहे. पहिली गोष्ट सकाळी उठल्यानंतर थोडा तरी व्यायाम करा, तसेच योगासने करा , प्राणायाम करा यामुळे काय होत की आपल्याला दिवसभर ताजतवान वाटत. दिवसभरात तुम्ही जी काही कामे कराल त्यामध्ये तुम्हाला उत्साह वाटेल.

दुसरी गोष्ट रात्रीचे जेवण आहे ते शक्यतो हलके घ्या. जास्त जड अन्न खाऊ नका कारण ते व्यवस्थित पचत नाही. मित्रांनो रात्रीचे जेवण केल्यानंतर किमान 2 तासांनी आपण झोपले पाहिजे. काही लोकांना झोपतांना मोबाइल, टीव्ही लॅपटॉप बघण्याची सवय असते. या गोष्टीमुळे आपली झोपमोड होते. म्हणून या गोष्टी जास्त वापरू नका. मित्रांनो आम्ही आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्की आवडेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *