अजिबात दुर्लक्ष करू नका.. भविष्याचे संकेत देतात ही स्वप्ने, फक्त समजून घ्यायची गरज असते.

स्वप्नात काहीही दिसण्याचा एक विशिष्ट अर्थ असतो. असे मानले जाते, की स्वप्नात व्यक्ति जे बघतो ते त्याच्या भविष्याशी निगडीत असते. स्वप्न शास्त्रामध्ये काही अशी स्वप्ने सांगितली आहेत जी बघितल्यामुळे गरीबी दूर होण्याचे संकेत मिळतात. अशी मान्यता आहे, की या स्वप्नांचा परिणाम खूप हळू हळू होतो. पण हे सत्य आहे.

आपल्या आयुष्यात प्रत्येक मनुष्याच्या जीवनातील घटना कोणत्या ना कोणत्या गोष्टींचा संकेत देत असतात. काही चांगले संकेत असतात, जे व्यक्तींच्या बाबतीत घडून आले,तर त्याचा अर्थ आहे भविष्यात त्यांना शुभ लाभाची प्राप्ती होण्याची शक्यता असते.जसे नैसर्गिक संकेत असतात, त्याचप्रमाणे स्वप्नातील संकेत पण समजून घेण्याची गरज आहे. आज अशाच काही संकेतांबद्दल आपण जाणून घेऊया.

स्वप्नात उंदीर दिसणे- स्वप्नात उंदीर दिसणे दारिद्र्य दूर होण्याचे संकेत आहेत. असे म्हणतात जी व्यक्ति स्वप्नात उंदीर बघते, त्या व्यक्तीच्या घरातील धनाचा अभाव हळू हळू संपुष्टात येतो. या बरोबरच त्याच्या घरात शुभता पण येते. असे स्वप्न आपल्या घरातील सगळ्यात लहान मुलाला जरूर सांगा.

रिकामे भांडे भरताना दिसणे- जर तुम्ही स्वप्नात रिकामे भांडे भरताना बघितले, तर ते चांगले मानले जाते. असे म्हणतात, की ते स्वप्न घरातील तिजोरी भरण्यामध्ये मोलाचा वाटा आहे. असे स्वप्न बघितले तर घरातील तिजोरी भरतो. अशी मान्यता आहे, की ज्याप्रमाणे स्वप्नात रिकामे भांडे भरत जाते, त्याप्रमाणे तुमचा खिसाही भरत जातो.

गाईच्या शेणाच्या गोवर्या बनविणे- स्वप्नात स्वत: ला जर गाईच्या शेणाच्या गोवर्या बनविताना बघितले तर त्या व्यकीची प्रगति होते. असे मानले जाते, की हे स्वप्न गरीबी दूर करण्याबरोबरच प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे दूर करते. पण ह्या स्वप्नाबद्दल कोणालाही काही सांगू नका.

झाडू बघणे- झाडू हे माता लक्ष्मीचे प्रतिक मानले जाते. म्हणूनच,स्वप्नात झाडू पाहाणे शुभ मानले जाते. असे म्हणतात, की झाडू हे वैभवाचे प्रतिक आहे. अशी मान्यता आहे, की जर तुम्ही स्वप्नात झाडू बघितला तर समजून जा तुमच्या घरातील दारिद्र्य निघून जाणार आहे आणि घरात धन येण्याचे योग दिसत आहेत. माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे. हे स्वप्न आपली पत्नी किंवा आई यांना जरूर सांगा.

विजेची उपकरणे तूटताना बघणे- हे स्वप्न खूपच चांगले असते. असे म्हणतात, की विजेचे सामान किंवा उपकरणे बघणे हे दारिद्र्य घेऊन येते आणि ते तुटलेली बघणे म्हणजे गरीबी दूर जाणे आहे. हे स्वप्न शुभ मानून कोणालाही सांगता कामा नये. हे जर तुम्ही कोणाला सांगितले तर ते खरे होणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *