अंघोळ करण्यापूर्वी हे पीठ चेहऱ्याला चोळा,चेहरा गोरा होईल,वांग काळे डागवरील घरगुती उपाय.

बऱ्याच महिला आपला चेहरा गोरा आणि सुंदर दिसण्यासाठी वेळ आणि पैसा दोन्हीही खर्च करत असतात. परंतु याऐवजी जर हा घरगुती उपाय केला तर नैसर्गिकरित्या तुमच्या चेहऱ्याच्या समस्या दूर होऊन तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच ग्लो येईल. ज्वारी ही थंडावा देणारी असून चेहऱ्यासाठी ज्वारीचे पीठ उत्तम पर्याय आहे. तर यासाठी दोन चम्मच ज्वारीचे पीठ घ्यायचे आहे.

यामध्ये दुसरा घटक आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे हळद. हळद ही चेहऱ्यासाठी एक वरदान आहे. पूर्वीपासून आपण चेहऱ्यासाठी हळदीचा उपयोग करतो. आपल्या चेहऱ्यावरील काळसर झालेले डाग, मुरुमांचे डाग, वांगांचे डाग हे डाग घालवण्यासाठी गुणकारी आहे. अशी ही हळद ज्वारीच्या पिठामध्ये पाव चमचा घ्यायची आहे.

तिसरा घटक घ्यायचा आहे तो म्हणजे बदाम तेल. बदाम तेलामुळे देखील आपल्या चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या चांगल्या प्रकारे ग्लो येतो. असे हे बदाम तेल अगदी दोन थेंब घ्यायचे आहे. आता यामध्ये चौथा घटक घ्यायचा आहे लिंबूरस.

अगदी दोन थेंब लिंबूरस घ्यायचा आहे. कारण बऱ्याच जणांची स्किन ही सेन्सिटिव्ह असल्यामुळे चेहऱ्याची आग होऊ शकते. म्हणून दोन थेंब लिंबूरस घ्यायचा आहे. लिंबूरसामुळे चेहऱ्यावरील डाग पटकन जाण्यासाठी मदत होते. आता सर्वात शेवटचा व महत्वाचा घटक घ्यायचा आहे तो म्हणजे गुलाबपाणी. गुलाब पाण्यामुळे आपला चेहरा पूर्णपणे साफ होण्यासाठी याची मदत होते.

शिवाय आपल्या चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या ग्लो येण्यासाठी गुलाब पाण्याचा उपयोग खुप चांगल्या प्रकारे होतो. असे हे गुलाबपाणी ही पेष्ट बनवता येईल इतके हे गुलाबपाणी आपल्याला घ्यायचे आहे. असे हे चारही घटक चांगल्याप्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत. अशाप्रकारे अगदी छान पेष्ट तयार होईल. ही पेष्ट तुम्ही हात, पाय, काळसर झालेली मान, चेहरा यावर उपयोग करू शकता.

हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर लावण्यापूर्वी चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हळुवारपणे पुर्ण चेहऱ्यावर लावायचे आहे. जर चेहऱ्यावर काळसर डाग किंवा वांग असतील तर त्यावर गोलाकार आकारात मसाज करायचा आहे.

यामुळे आपल्या चेहऱ्यावरील रक्ताभिसरण क्रिया सुरळीत होते. शिवाय चेहऱ्यावर तेज येते, चेहरा तेजस्वी आणि फ्रेश दिसू लागतो आणि वांग, काळे डाग हळूहळू निघून जाण्यास मदत होते.

जर हा उपाय तुम्हाला चेहरा, मान, हात, पाय यावर करायचा असेल तर अंघोळीपूर्वी हा उपाय करू शकता किंवा फक्त चेहऱ्यासाठी करायचा असेल तर हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कधीही करू शकता. उपाय पूर्णपणे नैसर्गिक असून चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर करून चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी, चेहरा गोरा दिसण्यासाठी हा उपाय गुणकारी आहे. धन्यवाद..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *